Covaxin आणि Covishield लसीच्या मिश्रणासंबंधी सरकारचं मोठं पाऊल!
सरकारने दोन लसींच्या डोसांना मिक्सिंगच्याबाबतीत अजून एक मोठं पाऊल उचललं आहे.
मुंबई : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. तर कोरोनाच्या या कठीण लढाईविरोधात सरकारने दोन लसींच्या डोसांना मिक्सिंगच्याबाबतीत अजून एक मोठं पाऊल उचललं आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने Covaxin आणि Covishield लसीच्या मिश्रणावरील अभ्यासाला मान्यता दिली आहे.
दोन लसीच्या डोसाच्या मिक्सिंगचा अभ्यास आणि क्लिनिकल ट्रायलची जबाबदारी वेल्लोरच्या क्रिश्चन मेडिकल कॉलेजला मिळाली आहे.
300Volunteers होणार सहभागी
सेंट्रल ड्रग्स रेग्युलेटरीच्या विषय तज्ज्ञ समितीने 29 जुलै रोजी हा अभ्यास करण्यासाठी सुचवलं होतं. बैठकीदरम्यान, तज्ज्ञ समितीने सीएमसी, वेल्लोर इथल्या फेज -4 क्लिनिकल ट्रायल मंजूरी करण्याची सूचना केली होती. या चाचणीमध्ये, 300 निरोगी स्वयंसेवकांवर कोविड -19 चे कोवॅक्सिन आणि कोव्हिशील्ड लसीच्या मिश्रणाते परिणाम तपासले जातील.
या अभ्यासाचा मुख्य हेतू
या अभ्यासाचा उद्देश हा आहे की, एखाद्या व्यक्तीला पूर्ण लसीकरणाचा कोर्स पूर्ण करण्यासाठी कोवॅक्सिननचा एक डोस आणि कोविशील्डचा दुसरा डोस दिला जाऊ शकतो का? हा प्रस्तावित अभ्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) नुकत्याच केलेल्या अभ्यासापेक्षा वेगळा आहे. आपल्या अभ्यासाच्या आधारावर, आयसीएमआरने म्हटलं होते कं कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड एकत्र दिल्याने चांगले परिणाम दिसून आले आहेत.
ICMR च्या संशोधनामध्ये कॉकटेलचे रिपोर्ट समोर आला आहे. कोरोनाच्या विरोधात भारतीयांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिक्स डोसबाबत झालेल्या संशोधनाचे चांगले परिणाम समोर आले आहेत.
ICMR ने दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचे मिश्रण करून वॉलिंटीयर्सना देण्यात आलं. त्यानंतर करण्यात आलेल्या परिक्षणात संबधित कार्यकर्त्यांमध्ये कोरोना संसर्ग प्रतिकारकशक्तीत सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आलं.