नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढतोय. याचा परिणाम जगातील इतर देशांवर होणार आहे. यामुळे इतर देशांमध्ये दिल्या जाणाऱ्या लस (Vaccine)मध्ये कपात होऊ शकते. भारतात कोरोना संसर्गाची वाढ वेगाने होतेय. अशा परिस्थितीत भारत जगातील देशांमध्ये मर्यादित कोरोना व्हॅक्सिन पुरवेल अशी माहिती ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्यूनिझेशन (GAVI)चे प्रमुख सेठ बर्कले यांनी दिली.


90 दशलक्ष डोस अपेक्षित 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत हा विकसनशील देशांना लसीचा सर्वात मोठा पुरवठा करणारा देश आहे. सध्या भारतात कोरोनाची नवीन लाट सुरू आहे. ज्यामुळे सरकारने लसीकरण मोहीम वेगवान केली असून भारताला अधिक डोसची आवश्यकता आहे. ज्याचा अर्थ असा आहे की उर्वरित जगासाठी कमी लस उपलब्ध असेल असे GAVI प्रमुखांनी सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. मार्च आणि एप्रिलमध्ये आम्ही जवळपास 90 दशलक्ष डोसची अपेक्षा केली होती. पण आता ती पूर्ण होईल की नाही ? यावर शंका असल्याचेही सेठ बर्कले म्हणाले. 



जीएव्हीआय प्रमुख म्हणाले, "आम्हाला आशा आहे की विकसित देश वापरत नसलेल्या कोरोना लस उर्वरित जगामध्ये पुरवायला सुरूवात करतील अशी आशा आहे. उदाहरणार्थ, यूएसमध्ये  मॉडर्ना, फायझर आणि J&J लसीसोबत Novavax आणि AstraZeneca लस देखील उपलब्ध आहेत. '


सध्या सर्वात मोठे आव्हान म्हणजे लसीपर्यंत पोहोचणे. ते म्हणाले की आम्ही दोन अब्जांपेक्षा जास्त डोसची मागणी केली आहे. पण त्यापैकी बहुतेक वर्षाच्या अखेरीस आम्हाला मिळेल. वर्षाचा पुर्वाध आमच्यासाठी खूप आव्हानात्मक आहे. जर आम्हाला अधिक डोस मिळाले असते तर आम्ही त्यांना सर्वात गरजू देशांपर्यंत पोहोचवले असते असे बर्कले म्हणाले. अमेरिकेने लस उत्पादनात बरेच काम केले आहे. त्याच्या देशांतर्गत गरजा भागल्यानंतर जगाला त्याचे फायदे मिळतील याची खात्री आहे असल्याचेही ते म्हणाले.