कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या प्रवाशांच्या विमानप्रवासावर कायमची बंदी येऊ शकते. नागरी उड्डाण महासंचलनालयाने याबाबतची माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे विमानप्रवासात अनेक नियम समाविष्ट करण्यात आले आहेत. फेस शिल्ड आणि मास्क घालणं बंधनकारक असतंच. मधल्या जागेवर बसणाऱ्या प्रवाशाला पीपीई किट घालणं सक्तीचं असतं. मात्र अशाप्रकारे विमानप्रवासातले नियम न पाळल्यास प्रवाशाला विमानातून उतरवण्यात येईल, किंवा त्यांच्या विमानप्रवासावरच कायमची बंदी येऊ शकते.


अनेक प्रवासी अशाप्रकारच्या नियमांचं उल्लंघन करताना आढळत आहेत, किंवा काही प्रवाशांना सूचना देऊनही त्याकडे प्रवासी कानाडोळा करतात, त्यामुळे विमानप्रवासावरच बंदी घालण्याचा इशारा नागरी उड्डाण महासंचलनालयाने दिला आहे.


विमानातील प्रोटोकॉल पाळण्याबाबत प्रवाशाला सातत्यानं सांगितल्यानंतरही प्रवासी हे नियम पाळत नसेल, तर अशा प्रवाशावर नियम न पाळण्याचा ठपकाही ठेवला जाईल.


त्यासाठी सुद्धा महासंचलनालयाने वर्गवारी केली आहे. ज्यामध्ये पहिल्या वर्गवारीत ३ महिन्यांकरता विमानप्रवासावर बंदी असेल. दुसऱ्या वर्गात प्रवाशावर ६ महिन्यांची बंदी तर तिसऱ्या लेव्हलनुसार प्रवाशानावर २ वर्षांसाठी विमानप्रवासावर बंदी येणार आहे.


प्रवाशाचं गैरवर्तन, हिंसक वर्तन, केबिन क्रूसोबत चुकीचं वागणं, लाथ मारणं, धक्का देणं, तोंडी वाद घालणं अशा वर्तनाचा विविध गटात समावेश होतो, ज्यानुसार किती काळासाठी विमानप्रवासावर बंदी घालण्यात येईल, हे ठरवलं जाईल.