Coronavirus New Variant :  कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगाची चिंता पुन्हा एकादा वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट  'B.1.1529' सापडला आहे. नवा व्हेरिएंट डेल्टा आणि डेल्टा प्लसपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनेही सर्व राज्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचं जगभरात थैमान
गेल्या दोन वर्षांत कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. या संसर्गाने अनेक देशांची अर्थव्यवस्था घसरली आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे.  नवीन 'B.1.1.529' व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवानामध्ये सापडला आहे. सतत म्यूटेशन होत असलेल्या या व्हेरिएंटमुळे WHO सोबतच शास्त्रज्ज्ञही धास्तावले आहेत. हा नवीन व्हेरिएंट डेल्टा पेक्षा जास्त धोकादायक आहे आणि त्यापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.


नवी व्हेरिएंटची आतापर्यंत 26 प्रकरणं
कोरोनाच्या या नविन व्हेरिएंट  'B.1.1529' ची आतापर्यंत 26 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. बोत्सवाना, दक्षिण आफ्रिका आणि हाँगकाँग या तीन देशांमध्ये ही प्रकरणं आढळून आली आहेत. या नवीन व्हेरिएंटमध्ये आतापर्यंत ३२ उत्परिवर्तन झाल्याचं शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. नविन व्हेरिएंटचं म्यूटेशन म्हणजेच 30 पेक्षा जास्त वेळा रूप बदलणं ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे.


ब्रिटनने घेतला मोठा निर्णय
कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर हळूहळू सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी निर्बंध शिथिल केले होते. पण आता या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा ब्रिटने कठोर निर्णय घेतला आहे . दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवानामध्ये नवीन व्हेरिएंटची प्रकरण समोर आल्यानंतर ब्रिटनने सहा दक्षिण आशियाई देशांचा प्रवास तात्पुरता स्थगित केला आहे.


भारतातही जारी केला अलर्ट
कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटमुळे भारतानेही अलर्ट जारी केला आहे. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना इथून येणाऱ्या सर्व प्रवाशांची काटेकोरपणे तपासणी आणि चाचणी करण्यात यावी, अशा सूचना भारत सरकारने सर्व राज्यांना दिल्या आहेत. याबाबत केंद्रीय राज्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. सध्या देशात नवा व्हेरिएंट B.1.1.529 चं कोणतंही प्रकरण नोंदवले गेले नाही.


डेल्टापेक्षाही घातक नवा व्हेरिएंट
नवा व्हेरिएंट डेल्टा आणि डेल्टा प्लसपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं नोंदवलं गेलं आहे. सध्याची लस या व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी आहे की नाही, याचा अभ्यास केला जातोय. या अभ्यासाला वेळ लागू शकतो. अशा स्थितीत या व्हेरिएंटने कहर केला तर ती आणखी चिंतेची बाब ठरू शकते.


इटली आणि जर्मनीचीही कठोर पावलं
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे ब्रिटनपाठोपाठ इटली आणि जर्मनीनेही कठोर पावलं उचलली आहेत. जर्मनीने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या बहुतांश प्रवाशांवर रोख लावला आहे.  इटलीमध्येही दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांना प्रतिबंध केला आहे. याशिवाय सिंगापुरने दक्षिण आफ्रिकेतील सात देशांची विमान उड्डाणं अनिश्चित काळापर्यंत थांबवली आहेत.