नवी दिल्ली : कोरोना वायरसच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर आपण अशा स्थितीत पोहोचू जिथे हर्ड इम्युनिटी (Herd Immunity) येईल आमि तेव्हा वॅक्सीनची गरज लागणार नाही असे इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (All India Institute of Medical Sciences-AIIMS)चे संचालक डॉक्टर रंदीप गुलेरिया यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढला आणि वायरसमध्ये काही बदलच झाला नाही तर लोक वॅक्सीन घेण्याबद्दल विचार करतील. पण याची गरज लागणार नाही. 



बाजार आणि रस्त्यांवर गर्दी वाढत चाललीय. लोक या आजाराला सर्दी, खोकल्यासारखे सर्वसाधारण समजू लागलेयत. लोकांच्या निष्काळजीपणाचा तब्येतीवर खूप मोठा परिणाम होणार असे देखील डॉक्टर रंदीप गुलेरिया यांनी म्हटलंय. एकतर ही वॅक्सिन लवकर यावी. आणि आली तर सर्वाधिक जोखीम घेणाऱ्यांना दिली जावी असेही ते म्हणाले. इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असणाऱ्यांना लस लवकर दिल्यास हा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. 


या दरम्यान आपली इम्युनिटी चांगली होईल. आपल्यात रोग प्रतिकारक शक्ती वाढल्याचे नागरिकांच्या देखील लक्षात येईल.