चैन्नई : तामिळनाडू सरकारने राज्यातील लॉकडाऊन 15 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. दरम्यान राज्यातील लोकांना काही नियमांमधून शिथिलता देण्यात आली आहे. सरकारने लोकांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवीन नियमांनुसार  सरकारने रविवारी समुद्र तटांवर प्रतिबंध लावले आहेत. याशिवाय रविवारी सार्वजनिक समारंभांना बंदी घालण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तामिळनाडू सरकारतर्फे काही गोष्टींमधील निर्बंध कमी केले आहेत. नवीन आदेशानुसार शुक्रवार ते रविवारपर्यंत धार्मिक स्थळं बंद राहतील. तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिनने राज्यातील  9वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांबाबत तसेच कॉलेज 1 सप्टेंबरपासून निर्धारित कार्यक्रमानुसार पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.


केरळमधून येणाऱ्यांना कडक निर्बंध
तामिळनाडू सरकारने राज्यातील सिमांवर करडी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. विशेषतः केरळ राज्याच्या सिमेवर तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने अधिकारी पोलिस यांच्यासह नागरकोइलजवळ कालियाक्कविलई आणि कोयंबतूर जिल्ह्याजवलील वालयार सिमांवर सुरक्षा वाढवली आहे. पोलीस दुसऱ्या राज्यातून येणार्या लोकांना RT-PCRचाचणीचा रिपोर्ट दाखवल्याशिवाय प्रवेश देत नाही.


केरळमध्ये कोरोना केसेसमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांमध्ये केरळमधून 30 हजार कोविड 19 च्या रुग्णांची नोंद झाली आहे. प्रति दिवस मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे.