Covid 19 india : भारतात काही भागात कोरोनाचे रुग्ण (Corona cases) पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. मृत्यूदर (Death ratio) नियंत्रणात असले तरी देखील कोरोनाच्या रुग्णांमध्ये (covid 19 patients) वाढ होत आहे. डब्ल्यूएचओने म्हटलं की, कोरोना  व्हायरसमुळे अजूनही जीविताचा धोका कायम आहे. बुधवारी कोरोना व्हायरसने (Corona virus) पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढवली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. व्हायरस अजूनही संपलेला नाही असं देखील WHO ने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी दिल्लीत बुधवारी मंगळवारच्या तुलनेत बुधवारी 50 टक्के वाढ पाहायला मिळाली. पण मृतांमध्ये वाढ झालेली नाही. दिल्लीत मंगळवारी 202 रुग्ण वाढले होते. तर बुधवारी 299 रुग्ण वाढले आहेत. दिल्लीत 504 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असल्याने चिंता नसली तरी देखील सतर्क राहण्य़ाची गरज आहे.


मुंबईत बुधवारी कोरोनाचे 73 नवीन रुग्ण वाढले आहेत. 17 मार्चनंतर ही ही सर्वात मोठी वाढ आहे. ज्यामध्ये 68 जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. (corona cases in Mumbai)


अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हायरसचा BA.2 व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे. 


न्यूझीलंडमध्ये बुधवारी कोरोनाचे  9,495 नवे रुग्ण वाढले. ज्यापैकी 1,828 रुग्ण हे ऑकलँडमध्ये आढळले आहेत. 


चीनमध्ये 29,317 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघायमध्ये 25,000 हून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. या भागात लॉकडाऊन (Lockdown) लागू आहे.