Covid-19 : चीनसह (China) काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने (Corona) थैमान घतलं आहे, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही (Central Government) अलर्ट नोटीस (Alert Notice) जारी केली आहे. राज्यांनीही विविध उपाययोजना केल्या आहेत. बिहार राज्य सरकारनेही (Bihar Government) अलर्ट जारी केला आहे. बिहारमधल्या बोधगया (Bodhgaya) इथं बौद्ध धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून देशासह परदेशातील नागरिकही या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात सात विदेशी नागरिक (Foreigner) कोरोना संक्रमित (Corona Positive) असल्याचं आढळून आलं. ही संख्या वाढून आता 11 इतकी झाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोधगयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन
मिळालेल्या माहितीनुसार 24 डिसेंबरला या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विदेशी पर्यटक बोधगयामध्ये दाखल झाले. यात एक नागरिक इंग्लंड (England), 10 म्यानमार (Myanmar) आणि बँकॉकचे (Bangkok) नागरिक आहेत. या सर्व विदेशी नागरिकांची आरटी-पीसीआर चाचणी (RT-PCR Test) करण्यात आली. ज्यात सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. बोधगयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर रंजन कुमार सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या सर्व नागरिकांना एका हॉटेलमध्ये अलगीकरणात (Isolation) ठेवण्यात आलं आहे. 


विमानतळावर कोरोना टेस्टिंग सुरु
केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार मुंबई, दिल्ली, हैदराबाद बंगळुरु, चेन्नई, अहमदाबाद, पुणे, इंदौर आणि गोवासह सर्व विमानतळांवर (Airport) आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना टेस्टिंग (Corona Testing) सुरु करण्यात आली आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधल्या प्रवाशांची टेस्टिंग अनिवार्य करण्यात आल्याची माहिीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) यांनी दिली आहे. या देशातून आलेले प्रवासी कोरोना बाधित आढळल्यास त्यांना क्वारंनटाईन (Quarantine) करण्यात येणार आहे. 


देशभरात आज मॉक ड्रील
जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर देशात विशेष सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशभरातील रुग्णालयात आज मॉकड्रील (Mock Drill) राबवण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज देशभरातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधांची चाचपणी करण्यासाठी मॉक ड्रिल राबवलं आहे. याअंतर्गत बेड, ऑक्सिजन यासह आरोग्याच्या सुविधांबाबत तयारीचा आढावा घेतला जात आहे. याशिवाय थर्मल स्कॅनर, ऑक्सीमीटर, मास्क, सॅनिटाझर या गोष्टींचा साठा वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मॉकड्रीलचे रिपोर्ट केंद्र सरकारकडे सोपवले जाणार आहेत. 


कोरोनाची चिंता वाढवणारी भविष्यवाणी
चीनमध्ये वाढत्या कोरोना संकटाचं सावट जगभरातील देशांवर पसरलं आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या BF.7 व्हेरिएंटचे चार रुग्ण भारतातही आढळले आहेत. अमेरिकेतल्या वैद्यानिकांनी एक भविष्यवाणी केली असून कोरोना महामारीची नवी आणि धोकादायक लाट पुढच्या तीन महिन्यात येणार असून यात लाखो लोकांचा जीव जाऊ शकतो. पुढील तीन महिन्यात जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के तर चीनच्या एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के जनतेला कोरोनाची लागण होईल, असा इशारा देण्यात आला आहे. सध्याची स्थिती ही केवळ साथीची सुरुवात आहे, असे अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी म्हटलं आहे.


चीनमध्ये 60 टक्के लोकसंख्या कोरोनाच्या विळख्यात
चीनमधली हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांनी भरुन गेली आहेत. तर अमेरिका आणि युरोपमध्ये तापाच्या आणि अंगदुखीच्या गोळ्यांची मोठी कमतरता जाणवतेय. त्यामुळे औषध विक्रीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. पुढच्या काळात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह आहेत.चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं अक्षरश: धुमाकूळ घातलाय. चीनप्रमाणेच हा व्हेरियंट इतर देशांमध्येही पसरला तर काय? नुसत्या कल्पनेनं जगभरातील संशोधकांचा थरकाप उडालाय. या नव्या व्हेरियंटमध्ये सातत्यानं बदल होतोय. त्यामुळे कोरोनाचा प्रसार कसा रोखायचा याची चिंता संशोधकांना सतावतीय.