मुंबई : सध्या देशभरात कोरोना इन्फेक्शनच्या उपचारांसाठी रेमेडसवीरची खूप कमतरता आहे आणि दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे. अशा परिस्थितीत आता कोरोना संक्रमित कमी गंभीर रूग्णांच्या उपचारांसाठी आणखी एक औषध वापरले जाऊ शकते. हे औषध झायडस कॅडिलाचे (Zydus Cadila) विराफिन (Virafin) आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) शुक्रवारी 23 एप्रिल रोजी झायडस कॅडिलाच्या  (Zydus Cadila) विराफिनला (Virafin) कोरोनाचा संसर्ग कमी गंभीर प्रमाणात झालेल्या रुग्णांना एमरजन्सी परिस्थितीत वापरास मान्यता दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, सुरुवातीलाच हे औषध वापरल्याने कोविड 19 रूग्णांवर याचा लवकर परिणाम होईल आणि परिस्थिती गंभीर होण्यापासून थांबवता येईल.


एएनआयच्या म्हणण्यानुसार, कॅडिला यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हे औषध इतर विषाणू संसर्गांवर देखील प्रभावी आहे. कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडचे एमडी डॉ. शर्विल पटेल म्हणतात की, सुरुवातीला हे औषध दिल्यास विषाणूचे प्रमाण कमी होईल आणि परिस्थिती गंभीर होणार नाही.


RT-PCR रिपोर्ट 7 दिवसात निगेटिव्ह


झायडस कॅडिला (Zydus Cadila) असा दावा करतात की, या औषधाच्या वापरामुळे कोरोना संक्रमित रूग्णांचा RT-PCR रिपोर्ट 7 दिवसात निगेटिव्ह आला आहे. याशिवाय रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकताही कमी लागते. विराफिन (Virafin) हे एक अँटीव्हायरल औषध आहे. ज्याला काळजीपूर्वक बनवले आहे.


कोरोना रुग्णांवर याच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीमध्ये चांगले परिणाम दाखवले आहेत. हे औषध कोरोना रूग्णांना सुरुवातीच्या काळात देण्यात आले होते, ज्यामुळे मध्यम संक्रमीत रुग्णांमध्ये क्लिनिकल आणि व्हायरलॉजिकल सुधारणा लक्षणीय झाली आहे.


या औषध कंपनीच्या म्हणण्यानुसार, ज्या कोरोना रुग्णांवर या विराफिन (Virafin) औषधाचा उपचार केला गेला आहे, त्यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट 7 दिवसात निगेटिव्ह आला आहे. हे जवळपास 91 टक्के केसेसमध्ये दिसून आले आहे. हे औषध केवळ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच उपलब्ध असेल. या औषधाला इंस्टीट्यूशनल सेटअप्स  किंवा रुग्णालयांच्या वापरासाठी बनवले गेले आहे. म्हणजेच हे औषध फक्त रुग्णालयांमध्येच उपलब्ध असेल.