नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Coronavirus) भारतात खूप वेगाने वाढत आहे. याबद्दल लोकांमध्ये बरीच भीती दिसून येत आहे. या कारणामुळे लोक वारंवार सीटी स्कॅन (CT Scan) करीत आहेत. हे पाहता एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Director Dr. Randeep Guleria) यांनी सोमवारी कोविड च्या सौम्य संसर्गाच्या बाबतीत सीटी स्कॅनबाबत (CT Scan) जनतेला इशारा दिला. त्याचे दुष्परिणाम होत आहेत. वारंवार सिटी स्कॅन केल्याने फायदा होण्याऐवजी जास्त त्रासच (Side Effects) सहन करावा लागू शकतो असे गुलेरिया म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हलक्या संसर्गाच्या बाबतीत सीटी स्कॅन न करण्यावर भर दिला जातो. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.



कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समजल्यानंतर बरेच लोक सीटी स्कॅन घेत आहेत. कोणत्याही आवश्यकतेशिवाय सीटी स्कॅनमुळे नुकसान होऊ शकते. एक सीटी स्कॅन हे 300 ते 400 छातीच्या एक्स-रे प्रमाणेच आहे. 


आकडेवारीनुसार, तरुण वयात वारंवार सीटी स्कॅन केल्याने कर्करोगाचा धोका नंतर वाढू शकतो असे गुलेरिया म्हणाले.


रेडिएशनच्या वारंवार संपर्कात आल्यामुळे शरीराला नुकसान पोहोचते. म्हणूनच, ऑक्सीजन सेच्युरेशन लेव्हल सामान्य असल्यास सौम्य संसर्ग असल्यास सीटी स्कॅन करण्याचे कोणतेही कारण नसते असे डॉक्टर म्हणाले.


हॉस्पिटलमध्ये दाखल आणि मध्यम संसर्ग झाल्यास सीटी स्कॅन केले जाते.'घरी उपचार घेत असलेल्या लोकांनी स्टिरॉइड्स घेऊ नये. स्टिरॉइड्स फक्त मध्यम आजारांवरील लक्षणांमुळेच दिली जातात' असे रणदीप गुलेरिया म्हणाले. 


सर्वात आधी ऑक्सिजन देणे- ऑक्सिजन देखील एक औषधाप्रमाणे काम करते. त्यानंतर स्टिरॉइड दिले जाऊ शकते. होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. सेच्युरेशन 93 किंवा त्यापेक्षा कमी होत असेल तर बेशुद्धी होण्याची वेळ येते. छातीत दुखणे यासारख्या परिस्थिती झाली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा असेा सल्ला गुलेरिया यांनी दिला.