COVID in India : देशात आणखी एका राज्यात लॉकडाऊन, कोरोनाची संख्या वाढल्याने निर्णय
COVID-19 in India : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही. आता गोवा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने गोवा सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : COVID-19 in India : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही. आता गोवा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने गोवा सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. आता गोव्यात कर्फ्यू वाढवून तो 31 मे पर्यंत वाढविण्यात आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. गोव्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात न आल्याने 23 मे पर्यंत संचारबंदी लागू केली होती. गोव्यात पाचव्या दिवशी तीन लाखांपेक्षा कमी रुग्ण सापडले आहेत.
गोवा सरकारने शुक्रवारी सुरु असलेल्या कोविड -19 निर्बंधांना (COVID-19) 31 मे पर्यंत वाढ केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबात जाहीर केले: "आम्ही राज्यात कर्फ्यू 31 मे पर्यंत वाढवत आहोत. पूर्वीचे निकष पूर्वीप्रमाणेच चालू राहतील. कर्फ्यूच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंची दुकान, किराणा दुकान, दारुच्या दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 1 या वेळेत काम करण्याची परवानगी आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत रेस्टॉरंट किचन आणि मेडिकल स्टोअर्स सुरू ठेवण्यास परवानगी आहे.
दरम्यान, देशात नवीन कोरोनामध्ये भर पडत आहे. सलग 5 व्या दिवशी 3 लाखांपेक्षा कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्याचवेळी गेल्या 24 तासांत 4200 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील दिवसात कोरोनातून बरे झालेल्या 3.57 लाख रुग्णांना घरी सोडण्यात आले. दुसरीकडे, चाचणी आणि लसीकरणाच्या बाबतीत, 20 मे रोजी कोविड 19 वर 20 लाखाहून अधिक चाचणी घेण्यात आली. त्याचबरोबर, देशात आतापर्यंत कोरोनाच्या 19 कोटीहून अधिक लस डोस देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 21 मे रोजी सकाळी आठ वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अखेरच्या एका दिवसात कोरोनाचे 2,59,591 नवीन रुग्ण आढळले. देशात कोविड संसर्गाची एकूण 2,60,31,991 प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्याच वेळी, कोरोनामधून आतापर्यंत 2,91,331 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली आहे. देशात सध्या कोरोनाची 30,27,925 सक्रिय प्रकरणे आहेत.
32 कोटींपेक्षा जास्त चाचणी
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR)जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोविड-19 मध्ये आतापर्यंत 32,44,17,870 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. 20 मे रोजी 20,61,683 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. दुसरीकडे, आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की आतापर्यंत कोरोना लसीचे 19,18,79,503 डोस देशभरात देण्यात आले आहेत.