Credit Card Payment : क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणं प्रत्येकाच्या प्राधान्य क्रम यादीत असायलाच पाहिजे. नाहीतर तुमच्याकडून दंड आकारला जातो. त्याचबरोबर, उच्च व्याजदर किंवा तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये घट यासारखे परिणाम होऊ शकतात. जर तुम्ही देखील तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी भरण्याची अंतिम मुदत चुकवली असेल तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांनुसार, क्रेडिट कार्ड जारीकर्ता तुमच्या खात्याला क्रेडिट माहिती कंपन्यांच्या (CICs) कारणामुळे गोठवलं जाऊ शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देय तारखेपासून तीन दिवसांपेक्षा जास्त काळ रक्कम थकबाकी राहिल्यास, जारीकर्ता दंड शुल्क किंवा उशीरा पेमेंट शुल्क देखील आकारू शकतो. रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशात असं नमूद केल आहे की, जारीकर्त्याने क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये (Credit Card Statement) दर्शविल्यानुसार देय तारखेपासून 'देय दिवस' आणि दंड आकारणीची गणना केली पाहिजे.


याव्यतिरिक्त, दंडात्मक व्याज किंवा उशीरा पेमेंट शुल्क केवळ क्रेडिट कार्ड धारकाने भरण्यात अयशस्वी झालेल्या थकबाकीवर आकारले जाते आणि एकूण रकमेवर नाही. क्रेडिट कार्ड जारीकर्ता क्रेडिट कार्डधारकांना किमान एक महिन्याची पूर्वसूचना दिल्यानंतरच हे शुल्क बदलू शकतो.


जर तुम्हाला वाटत असेल की जारीकर्त्याद्वारे आकारले जाणारे शुल्क योग्य नाहीत, तर तुम्ही सर्व देय देयके भरल्यानंतर तुमचं क्रेडिट कार्ड सरेंडर करण्याचा पर्याय निवडू शकता. अशा प्रकरणांमध्ये, क्रेडिट कार्ड खातं बंद (Credit Card Account) करण्यासाठी जारीकर्ता तुमच्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क लादू शकत नाही. तुम्ही खातं बंद करण्यासाठी अर्ज करता तेव्हा, जारीकर्त्याला RBI आदेशानुसार सात कामकाजाच्या दिवसांत तुमच्या विनंतीवर प्रक्रिया करावी लागते.


जारीकर्ता निर्धारित कालावधीत बंद करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास, क्रेडिट कार्ड खाते बंद होईपर्यंत विलंब केल्याबद्दल जारीकर्त्याकडून तुम्हाला प्रतिदिन ₹ 500 दंड आकारला जाईल.