Credit Score: 4 गोष्टींमुळे तुमच्या क्रेडिट स्कोरला बसतो फटका, ही चूक करु नका
क्रेडिट स्कोरवर तुम्हाला कर्ज मिळणार की नाही हे अवलंबून असतं. त्यामुळे CIBIL स्कोर चांगला ठेवण्यासाठी काही चुका टाळल्या पाहिजेत.
मुंबई : आजकल लाखो लोकं क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. क्रेडिट स्कोअर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट इतिहास सांगते. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळते आणि जर क्रेडिट स्कोर खराब असेल तर कर्जामध्ये अनेक अडचणी येतात. कारण ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्याने त्याचे पैसे बुडणार नाहीत याची खात्री कर्ज देणाऱ्या बँकेला किंवा संस्थेला असते. अशा परिस्थितीत कर्ज सहज मंजूर होते. पण याचा अर्थ असा नाही की कर्ज केवळ CIBIL स्कोअरच्या आधारावर मंजूर केले जाते.
कर्ज मंजूरीमध्ये तुमचा CIBIL स्कोर खूप मोठी भूमिका बजावतो. क्रेडिट स्कोअर 300 ते 900 दरम्यान निश्चित आहे. सहसा 750 किंवा त्याहून अधिक गुण चांगले मानले जातात. तुम्हालाही तुमचा क्रेडिट स्कोअर कायम ठेवायचा असेल, तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारे घटक जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
चांगला क्रेडिट स्कोर असण्याचे फायदे
1. कर्ज मिळणे सोपे होईल.
2. परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज मिळू शकते.
3. दीर्घ कालावधीसाठी कर्ज मिळू शकते.
4. तुमची कर्ज विनंती लवकरच मंजूर केली जाऊ शकते.
5.तुम्हाला कर्ज प्रक्रिया शुल्क आणि इतर शुल्कांवर सूट मिळू शकते.
हे 4 घटक तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करतात
स्टेट बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अनिल कुमार मिश्रा सांगतात की, तुम्ही घेतलेले इतर कर्ज किंवा क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची योग्य वेळी पैसे दिले तरी त्याचा थेट तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. तुम्ही कर्ज घेतल्यानंतर वेळेवर EMI भरल्यास आणि कर्जाची पूर्ण परतफेड केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो.
तुमच्या क्रेडिट युटिलायझेशन रेशोचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवरही परिणाम होतो. तुमच्या एकूण क्रेडिट मर्यादेपैकी तुम्ही वापरत असलेल्या टक्केवारीला क्रेडिट युटिलायझेशन म्हणतात. क्रेडिट वापराचे प्रमाण 30% किंवा कमी असावे. याचा अर्थ असा की तुम्ही क्रेडिट कार्डवर जास्त अवलंबून नाहीत. अशावेळी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला होतो.
क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे तुमचं कर्ज मिश्रित हवं. म्हणजे सुरक्षित कर्ज (कार लोन, होम लोन, गोल्ड लोन) आणि असुरक्षित कर्ज (वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड) आहेत. या सर्वांच्या गुणोत्तराला क्रेडिट मिक्स म्हणतात. साधारणपणे दोनपेक्षा जास्त असुरक्षित कर्ज घेऊ नये. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो.
क्रेडिट वय तुमच्या पहिल्या क्रेडिटच्या तारखेपासून मोजले जाते (क्रेडिट कार्ड किंवा कर्ज). तुमचे क्रेडिट वय जितके जास्त असेल तितकी तुमची विश्वासार्हता जास्त असेल आणि ते तुमच्या स्कोअरसाठी चांगले असेल. साधारणपणे, ज्यांची क्रेडिट खाती 3 वर्षे किंवा त्याहून अधिक जुनी आहेत, त्यांना प्राधान्य दिले जाते.