चंदीगड : क्रिकेटच्या मैदानात शतक पूर्ण झाल्यानंतर, तुमची शतकी खेळी साजरी करण्याच्या अनेक विविध पद्धती असतात, यात बॅटवर करणे, हेल्मेट काढून लोकांना अभिवादन करणे, झुकणे, किंवा देवाचे आभार मानणे असे प्रकार तुम्ही पाहिले असतील.


शतक ठोकल्यानंतर केली करामत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण एका रणजी सामन्यात एका खेळाडूने काहीतरी नवीन केलं, एवढं नवीन की तुम्हाला हसू आवरता येणार नाही. क्रिकेटर गुरकीरत मान याचं शतक पूर्ण झाल्यानंतर त्याने बॅटवर केली, हेल्मेट काढलं आणि नंतर मैदानात मुजरा ऐकण्याच्या स्टाईलमध्ये बसला की काय असं वाटत असताना, त्याने पोझ तशी पोझं दिली ती चक्क फोटो काढण्यासाठी.



कोण आहे हा करामती?


हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, नेटीझन्स यावर हसून बेहाल आहेत. गुरकीरत मान हा २७ वर्षाचा खेळाडू, पंजाब टीमकडून खेळताना त्याने ११२ चेंडूत १११ धावा केल्या. 


शतक ठोकल्यानंतर गुरकीरतने अशी काही पोझ मैदानात दिली की कुणालाही हसू आवरता येत नव्हतं, तर मैदानातले खेळाडू देखील चक्रावले होते. रणजीचा हा सामना गुरकीरतच्या स्टाईलने चांगलाच गाजला.