Crime News : नवऱ्याने मागितला चहा, बायको भयंकर चिडली, डायरेक्ट चाकू काढला आणि...
दिवसाची सुरुवात ही चहा शिवाय होतच नाही. मात्र, बरेचजण दिवसातून अनेक वेळा चहा घेतात. याच चहावरुन बऱ्याच जोडप्यांमध्ये वाद होतात. उत्तर प्रदेशात मात्र चहा मागणाऱ्या पतीवर पत्नीने हल्ला केला आहे.
Uttar Pradesh Crime News : अनेक जोडप्यांमध्ये चहावरुन वाद होतो (Argument over tea). चहा वरुन उत्तर प्रदेशात भयानक घटना घडली आहे (Crime News). नवऱ्याने चहा मागितला म्हणून बायको भयंकर चिडली. रागाच्या भरात बायकोने नवऱ्यावर थेट चाकूने हल्ला केला. चाकु हल्ल्यात नवरा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यात ही घटना उघडकीस आली आहे. चहा मागितल्यामुळे संतापलेल्या पत्नीने पतीवर चाकूने हल्ला केला आहे. चाकू हल्ल्यापूर्वी दोघांमध्ये वाद झाल्याचे समजते (Uttar Pradesh Crime News ).
जखमी पतीचे नाव नितीन आहे. फतेहगढ कोतवाली भागातील बुधनामाऊ गावात नितीन आपल्या कुटुंबासह राहतो. त्यांच्या लग्नाला 15 वर्षे झाली आहेत. या दोघांना तीन मुले देखील आहेत.
या दोघा पत्नीमध्ये किचनमध्ये दूध सांडल्यावरुन वाद झाला होता. यानंतर नितीन याने पत्नीकडे चहा मागितला. यावरुन दोघांमध्ये पुन्हा तुफान वाद झाला. रागाच्या भरात नितीनच्या पत्नीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नितीन याच्या छातीवर, पोटावर आणि तोंडावर जखमा झाल्या आहेत. नितीन याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुलांसमोरच नितीनच्या पत्नीने त्याच्यावर चाकूने वार केले. यामुळे मुल घाबरुन रडायला लागल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. या घटने मुळे एकच खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून नितीनवर हल्ला झाल्याने पोलिसांनी प्राथमिक तक्रार नोंदवून त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
या दोघांमध्ये सातत्याने भांडण होत असल्याचे माहिती शेजाऱ्यांकडून मिळाली. यांच्यातील वाद हा विकोला पोहचला असून पत्नीने थेट पतीवर हल्ला केला आहे. पोलिस कक्षातर्फे या दोघांचे समुपदेशन करण्यात येणार असल्याचे समजते.