Crime News Angry Father Killed Daughter: संतापलेल्या अवस्थेत केलेली कृती संकटांना आमंत्रण देते असं म्हटलं जातं. अनेकदा हा रागच अनेक समस्यांच्या मूळाशी असतो. या रागामुळे आपण संकटात सापडू शकतो. संतापलेले असताना घेतलेला एखादा निर्णय संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करु शकतो. अनेकांना क्रोधाच्या परिणामांची कल्पना असते. मात्र त्यांना स्वत:वर नियंत्रण ठेवता येत नाही. अशाच 2 हादरवून सोडणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. यापैकी एका घटनेत वडिलांनी मुलीची हत्या केली. तर दुसऱ्या प्रकरणात एका व्यक्तीने संपूर्ण कुटुंबालाच संपवलं.


मुलीने नकार दिल्याने हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीने आपल्याच मुलीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही व्यक्ती तिच्या मुलीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. मात्र मुलीचा लग्नाला नकार होता. मला अजून शिकायचं आहे. मला स्वत:च्या पायावर उभं राहून काहीतरी करुन दाखवायचं आहे, असं ती वडिलांना सांगायची. मात्र मुलगी लग्नाला वारंवार नकार देत असल्याने तिचे वडील संतापले. संतापलेल्या या व्यक्तीने कुऱ्हाडीने मुलीच्या मानेवर हल्ला करुन तिचे प्राण घेतले.


दुपारी लेकीच्या रुममध्ये गेला अन्...


हनुमानगढमधील गोगामेडी पोलीस स्टेशनचे प्रमुख अजय कुमार यांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचं नाव गोविंद सिंह असं आहे. 55 वर्षीय किसानने आपली मुलगी कृष्णाची हत्या केली. गोविंद अनेकदा कृष्णावर लग्नासाठी दबाव आणायचा. मात्र कृष्णा कायम त्याला नकार द्यायची. शनिवारी दुपारी कृष्णा तिच्या रुममध्ये झोपली होती त्याच वेळी गोविंद तिच्या रुममध्ये गेला. गोविंदने आपल्याच पोटच्या लेकीवर अनेकदा कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये कृष्णा गंभीर जखमी झाली. कृष्णाला तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान कृष्णाचा मृत्यू झाला. कृष्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


चंद्रपूरमध्ये आई आणि 2 मुलींची हत्या


असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये घडलं. येथे रविवारी एका 45 वर्षीय व्यक्तीने आपली पत्नी आणि 2 मुलींवर कुऱ्हाडीने हल्ला करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र या व्यक्तीचा जीव वाचला. घरात तिघांचा मृतदेह पाहून नातेवाईकाने यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा सुरु केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मरण पावलेल्यांमध्ये 19 वर्षीय प्रणाली, 20 वर्षांची तेजस्विनी आणि पत्नी अलकाचा (40) यांचा समावेश आहे. पती-पत्नीमध्ये पैशांवरुन अनेकदा वाद व्हायचा. तिघींची हत्या करुन आत्महत्या करण्याचा या व्यक्तीचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. नेमकं काय घडलं की या व्यक्तीने आपल्या घरातील तिन्ही महिलांची हत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.