Crime News : देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चालला आहे. महिलांवर अत्याचाऱ्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अगदी उघडपणे माथेफिरुंकडून महिलांवर अत्याचार करण्यात येत असल्याचे अनेकदा समोर आलं आहे. अशातच आता बंगळुरुमध्ये (bengaluru crime) एका जेष्ठ नागरिकांने भर गर्दीत एका महिलेला विनयभंग केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. एका मॉलमध्ये या माथेफिरुने एका महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि काहीच झालं नसल्याचे दाखत तिथून निघून गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरूमधील एका मॉलमधून हा लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. वृद्ध व्यक्तीने सर्वांसमोर तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.  आरोपीने गजबजलेल्या मॉलमध्ये गेमिंग झोनमध्ये जाणूनबुजून एका महिलेला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.


हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) @HateDetectors नावाच्या पेजने शेअर केला आहे. 'व्हिडिओमध्ये एक पुरुष जाणूनबुजून एका महिलेला मागून स्पर्श करत असल्याचे दिसत आहे. यानंतर ती व्यक्ती तेथून निघून गेली. पीडित महिलेने याला विरोध केला नाही, असे या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा बंगळुरु पोलीस तपास करत असल्याचेही यामध्ये म्हटलं आहे. एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड करून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 


इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीने ही घटना लुलू मॉलमध्ये घडल्याचे सांगितले. 'जेव्हा मी या व्यक्तीला विचित्र वागताना पाहिले यानंतर मी त्याचा पाठलाग करताना एक व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये हा प्रकार रेकॉर्ड करण्यात आला होता. याबाबत मी तिथल्या गार्डकडे तक्रारही केली पण ती व्यक्ती कुठेच दिसली नाही, असे व्हिडीओ काढणाऱ्याने म्हटलं आहे.



हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या आणखी एका युजने म्हटलं की, 'ही घटना आज संध्याकाळी 6.30 वाजता लुलू मॉल फंटुरा बंगळुरू येथे रेकॉर्ड करण्यात आली. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती जवळपास उपस्थित असलेल्या महिला आणि मुलींसोबत असे कृत्य करत होता. सगळ्यात आधी जेव्हा मी त्याला खूप गजबजलेल्या परिसरात पाहिले तेव्हाच मला त्याचा संशय आला आणि मी रेकॉर्डिंग करत त्याचा पाठलाग केला.  आम्ही सुरक्षारक्षकाकडे गेलो आणि याबद्दल तक्रार केली. मग आम्ही त्याला शोधत आलो पण तो गायब झाला होता. मॉल व्यवस्थापनाने त्या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.' 


दरम्यान, व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक चांगलेच संतापले आहेत. त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. त्याला शिक्षा झाली पाहिजे, असे एका युजरने म्हटलं आहे. तर दुसर्‍या एका यूजरने, मुलगी त्याला मारले का नाही, तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, असं म्हटलं आहे. अशा लोकांना तुरुंगात टाकायला हवं असेही एकानं म्हटलं आहे.