Crime News : आपल्या प्रेयसीचं दुसरीकडे लग्न झाल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण  गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता. यातून त्याने एका हॉटेलमध्ये रुम बूक केला आणि तिथेच त्याने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकी घटना?
ही घटना बिहारमधल्या (Bihar) हाजीपूर इथली आहे. मृत तरुणाचं नाव रुपेश राज असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. हाजीपूर रेल्वे स्थानकासमोरच्या हॉटेलमध्येच रुपेशने एक रुम बूक केला. दुसऱ्या दिवशी आपल्याला ट्रेन पकडायची आहे असं कारण त्याने हॉटेलमध्ये दिलं. पण दुसऱ्या दिवशी चेक आऊट न केल्याने हॉटेलचा कर्मचारी रुमवर गेला. त्याने रुमचा दरावाजा बाहेर ठोठावला, पण आतून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल कर्मचाऱ्याला संशय आला. 


त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्याने ही गोष्ट हॉटेलच्या मॅनेरजला सांगितली. त्यांनी डुप्लिकेट चावीने रुमचा दरवाजा उघडला असता रुमच्या पंख्याला गळफास (Suicide) घेतलेल्या अवस्थेत रुपेशचा मृतदेह आढळून आला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या तपासात त्यांना रुममध्ये एक चिठ्ठी सापडली. रुपेशने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात दिलेल्या नंबरवर फोन करत पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली.


सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?
सुसाईड नोटमध्ये रुपेशने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली होती. चिठ्ठित (Suicide Note) त्याने लिहिलं होतं 'सॉरी पापा, सॉरी मम्मी मी ज्या मुलीवर प्रेम करतो तिला तुम्ही कधीच पसंत केलं नाहीत. माझ्या काय इच्छा आहेत हे तुम्ही कधी मला विचारलच नाही. मी जिच्यावर प्रेम करतो, तिचं आज लग्न आहे आणि तिच्याशिवाय मी जगू शकत नाही, तिच्या नाही तर मी इतर कोणत्याची मुलीशी लग्न करुन शकत नाही, त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे.' विशेष म्हणजे रुपेश हा बिहार मध्ये राहात होता. तर तो ज्या मुलीवर प्रेम करत होता ती मुलगी उत्तरप्रदेशमध्ये राहाते. 


कोर्टाच्या आवारातच हत्या
दरम्यान, गुजरातमध्येही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरत कोर्टात आरोपीला हजर करत असतानाच त्याची कोर्टाच्या आवारातच हत्या करण्यात आली. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांसमोरच त्याच्यावर चाकूचे वार करत हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर तिथून फरार झाले.  सूरज यादव असं मृत आरोपीचं नाव असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने सूरतमध्ये खळबळ उडाली असून या घटनेचं सीसीटीव्ही फुजेटही समोर आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.