नवी दिल्ली : नवी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मित्र जेलमध्ये असल्याचा फायदा घेत मित्रानेच बायकोसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. या घटनेची कुणकुण जेलमध्ये असलेल्या पतीला लागली होती. जेलमधून सुटलेल्या पतीने नंतर असं काय केलं की संपूर्ण राज्य या घटनेने हादरलं.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या सदर बाजार येथे एका खुनाची घटना घडली होती. 8 जूनच्या रात्री एका इसमाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. कुणाल असे या इसमाचे नाव होते. पोलिसांना या प्रकरणात तपास सुरु केला होता. 


या संपूर्ण प्रकरणात उत्तर दिल्लीते पोलिस अधिक्षक सागर सिंह कलसी यांनी दोन टीम करण्यात आल्या होत्या. प्रज्ञा आनंद एसीपी सदर बाजार आणि कन्हैया लाल यादव एसएचओ सदर बाजार यांच्या नेतृत्वाखाली या हत्येचा तपास सुरू करण्यात आला. तपासा दरम्यान, पोलिसांनी अनेक छापे टाकत आरोपीचा शोध सुरु केला. दिल्लीतली अनेक ठिकाणांवर छापा टाकत त्याला शोधण्याचा प्रयत्न केला आणि तीस हजारी या भागातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. रॉबिन असे या आरोपीचे नाव होते. 


आरोपीने केले धक्कादायक खुलासे 


पोलिसांनी आरोपी रॉबिन याची चौकशी केली असता त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. ज्या कुणालची त्याने हत्या केली, तो कुणाल रॉबिनचा चांगला मित्र होता.रॉबिन जेलमध्ये असल्याचा फायदा उचलतं कुणालने त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक माहिती दिली. ज्या दिवशी जेलमधून सुटला त्याच दिवशी त्याने पत्नी सोबत बाजारात फिरताना रंगेहाथ पकडले होते. त्याचवेळी बाजारात त्याचा चाकूने भोसकून हत्या केली. 


 पोलिसांनी या खुन्याच्या प्रकऱणात रॉबिनला ताब्यात घेत जेलमध्ये टाकले आहे.