Crime News: अश्लील व्हिडिओ बनवून धमकावणारा `लुटेरा`, पोलिसांनी वेशांतर केलं, सापळा रचला अन्...
Cyber Police Crime news: आरोपी मुलीच्या फोटोसह बनावट आयडी बनवून ऑनलाईन फसवणूक करत होते. तरुणीचा अश्लील व्हिडिओ (Viral Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी द्यायचे, याप्रकरणी सायबर सेलने तपास सुरू केला.
Obscene Videos Crime News: देशभरात ऑनलाईन फसवणूकची (Online fraud) प्रकरणं दिवसेंदिवस वाढतच असल्याचं पहायला मिळतंय. अशातच डुंगरपूर जिल्ह्यातील सायबर पोलिस स्टेशनने (Cyber Police Station) देशभरातील ऑनलाईन फसवणूक टोळीतील 2 फरार आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी देशभरात 100 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या चपळ भूमिकेमुळे आरोपींना अटक करण्यात यश आलं आहे.
मागील वर्षी 20 ऑक्टोबर रोजी एका पीडितेने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा कॉल आल्याचं सांगितलं होतं. तरुणीसोबत अश्लील व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. व्हिडिओ डिलीट करण्याच्या नावाखाली आरोपींनी ऑनलाईन 2 लाख 88 हजार 500 रुपये लंपास केले.
आरोपी मुलीच्या फोटोसह बनावट आयडी बनवून ऑनलाईन फसवणूक करत होते. तरुणीचा अश्लील व्हिडिओ (Viral Obscene Video) व्हायरल करण्याची धमकी द्यायचे, याप्रकरणी सायबर सेलने तपास सुरू केला. ज्या बँक खात्यांमध्ये ही रक्कम ऑनलाईन पाठवण्यात आली, त्यांचा तपशील काढण्यात आला. त्यावेळी एका कुलदीप नावाच्या व्यक्तीने ही बनावट खाती (Fake bank Account) तयार केली होती. त्याच्या मुसक्या आवळल्या.
तोतयागिरी करत पोलिसांनी टाकला डाव
फेसबुकवर मुलींच्या नावाने बनावट आयडी तयार केला जायचा. मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जायची. त्यानंतर त्याच्या व्हॉट्सअॅप मोबाईलवर (Whats App Call) अश्लील व्हिडिओचा कॉल रेकॉर्ड करत त्यांना धमकवलं जात होतं. पोलिसांनी डाव आखला. सायबर सेलच्या पथकाने तंत्रज्ञान आणि माहितीच्या मदतीने साधे कपडे, पोशाख बदलून आरोपीला जेरबंद केलंय.
आणखी वाचा - Watch: आरडाओरड...किंकाळ्या अन् पळापळ; उमेश पाल घटनेतील 32 सेकंदांचा CCTV VIDEO समोर!
दरम्यान, आरोपींनी देशभरात एक कोटींहून अधिक रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचं मान्य केलंय. सायबर गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती दक्षता घेणं गरजेचं आहे.