हैदराबाद : प्रेम हे प्रेम असतं, त्यामध्ये लोकं कोणतीही हद्द पार करण्यासाठी तयार असतात. लोकं प्रेमात चांगलं वाईट पाहत नाहीत. हे प्रेम अनेकदा लोकांना ताकद देते आणि आयुष्यात शेवटपर्यंत साथ देते. परंतु काही प्रेम कहाणी या अर्धवट राहतात. तर काही प्रेम कहाणींचा अंत खूप भयानक असतो. सध्या एक अशा प्रेम कहाणीचा किस्सा व्हायरल होत आहे, जो ऐकुण तुम्हाला आश्चर्य वाटेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

3 वर्षाच्या संबंधानंतर देखील या माथेफिरु तरुणाने गर्लफ्रेंडवर जोरदार हल्ला केला. मुलीच्या मानेवर, हातावर, पाठीवर त्याने अमानुषपणे वार केले आणि तो पळून गेला. यामागचं कारण हे होतं की, या तरुणीने दुसऱ्या मुलासोबत साखरपुडा केला होता.


हे प्रकरण हैदराबादच्या बाहेरील एलबी नगरचे आहे. दुसऱ्या मुलाशी लग्न केल्यानंतर तरुणीला तिच्या माथेफिरु प्रियकराने चाकूने 18 वेळा वार करुन जखमी केले. जखमी तरुणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि तिची प्रकृती चिंताजनक आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय आरोपी बसवा राज हा या पीडित तरुणीसोबत 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये होता, मात्र दुसऱ्या मुलाशी साखरपुडा केल्याने त्याला राग आला. बसवा राज हा हस्तिनापुरम येथील पीडितेच्या मामाच्या घरी तिला जाऊन भेटला. त्यांनंतर त्यांच्या भांडणं झाली. यादरम्यान त्याने पीडितेवर भाजीच्या चाकूने हल्ला केला आणि तेथून पळ काढला.


पीडितेच्या हातावर, मानेवर आणि पाठीवर असे त्याने 18 वार करण्यात आले. स्थानिक लोकांनी त्या तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. बसवा राजवर भारतीय दंड संहिता आयपीसी कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एलबी नगरचे पोलिस निरीक्षक अशोक रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे जबाब दंडाधिकाऱ्यांनी नोंदवले आहेत. ती आणि बसवा राज हे दोघे विकाराबाद जिल्ह्यातील दौलताबाद भागातील रहिवासी आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. ज्यामुळे तिने कुटूंबाच्या विरोधात न जाण्याचा निर्णय घेतला आणि घरच्यांनी ठरवलेल्या मुलासोबत लग्न करायला तयार झाली.


परंतु मला सोडून तु दुसऱ्याशी लग्न का केलं? असा राग डोक्यात घेऊन या माथेफिरु तरुणाने या तरुणीवरती जिवघेणा हल्ला केला. पोलिस आरोपीच्या शोधात आहेत आणि पुढील तपास सध्या सुरू आहे.