आईवडिलांशी व्हिडीओ कॉलवर बोलताना भारतीय तरुणाचा अमेरिकेत भीषण अपघात; अंगावरुन गेली 14 वाहने
अमेरिकेतील टेक्सासमध्ये भारतीय तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिथल्या लोकांनी थोडीही माणुसकी न दाखवली नाही. जर तरुणाची लोकांनी मदत केली असती तर आज त्याचा जीव वाचला असता.
Crime News : अमेरिकेत (America) भारतीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पर्यटन व्हिसावर (tourist visa) अमेरिकेत फिरायला गेलेल्या तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. गुजरातमधील (Gujarat News) या तरुणाचा रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला आहे. तरुणारून एकामागून एक 14 वाहने गेल्याने मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. गुजरातमधील पाटण येथील रहिवासी असलेला दर्शील ठक्कर चार महिन्यांच्या पर्यटन व्हिसावर अमेरिकेला गेला होता. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच पाटण येथे राहणाऱ्या ठक्कर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दर्शीलच्या आई वडिलांची रडून रडून प्रकृती ढासळली आहे.
गुजरातमधील पाटण येथे राहणारा दर्शील ठक्कर चा महिन्यांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर अमेरिकेला गेला होता. 29 जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास रस्ता ओलांडत असताना दर्शीलला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. यानंतर डझनहून अधिक वाहने दर्शीलच्या अंगावरुन गेली. यामुळे दर्शीलचा जागीच मृत्यू झाला. अनेक गाड्या अंगावर गेल्याने त्याचा मृतदेहाची फारच वाईट अवस्था झाली होती.
पाटण येथे राहणारा दर्शील पुढच्या महिन्यात भारतात परतणार होता. वडिलांसोबत फोनवर बोलत असतानाच कारने त्याला धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. ही दु:खद बातमी समजताच दर्शीलच्या कुटुंबावर शोककळा पसरली. तरुणाचा मृतदेह अमेरिकेतून पाटणला आणण्याची माहिती गुजरात शासनाला देण्यात आली आहे. सध्या दर्शीलचा मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पाटण येथील शिवकृपा सोसायटीत राहणारा दर्शील 9 एप्रिल रोजी टुरिस्ट व्हिसावर अमेरिकेला गेला होता. 26 सप्टेंबरला दर्शील भारतात परतणार होता. दर्शील ठक्कर 31 जुलैला संध्याकाळी टेक्सास, अमेरिकेतील ह्युस्टन येथे फिरण्यासाठी गेला होते. त्यावेळी तो आपल्या आई वडिलांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होता. दरम्यान, सिग्नल बंद असल्याने दर्शीलने रस्ता ओलांडण्यास सुरुवात केली. मात्र तो रस्ता ओलांडणार असतानाच अचानक सिग्नल सुटला आणि भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दर्शीलला धडक दिली.
दरम्यान, या अपघातावेळी दर्शीलचा मित्रही त्याच्यासोबत होता. कारने धडक दिल्याने दर्शील खाली पडला आणि एकापाठोपाठ एक 14 वाहनांनी त्याला तुडवले. यामुळे दर्शीलचा जागीच मृत्यू झाला. गुजरातमधील पाटण येथे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांना दर्शीलच्या मित्रानेच त्याच्या मृत्यूची माहिती दिली होती. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबावर शोककळा पसरली. दर्शीलचा मृतदेह भारतात आणण्यासाठी कुटुंबीयांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, मात्र अपघातात मृतदेहाची दुरवस्था झाल्याने तो भारतात पाठवणे शक्य झाले नाही. आता कुटुंबातील चार सदस्य अमेरिकेला रवाना झाले आहेत.