Crime News : पती आणि पत्नीत अनेक कारणांनी भांडणं होत असतात. काही वेळा ही भांडणं लगेच सुटतात तर काही वेळा या भांडणाचा भयानक शेवट होतो. अशीच एक घटना समोर आली आहे. पत्नीला ब्यूटी पार्लरला (Beauty Parlour) जाण्यापासून रोखल्याने संतापलेल्या पत्नीने धक्कादायक पाऊल उचललं. पतीच्या बोलण्याने रागावलेल्या या महिलेने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकं प्रकरण?
मध्यप्रदेशमधल्या इंदौरमधली (Indore) ही धक्कादायक घटना आहे. बलराम यादव आणि रीना यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली, पण त्यांच्यात कोणत्या कोणत्या कारणावरुन भांडण होत होतं. बलराम घरातच टेलरींगची छोटी-मोठी काम करतो. तर रीना त्याला त्याच्या कामात मदत करते. घटनेच्या दिवशी रीनाने आपण ब्युटी पार्लरला जात असल्याचं पती बलराम यादवला सांगितलं. पण त्याला बलराम यादव याने विरोध केला. यावरुन दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर ती स्वंयपाक घरात गेली आणि पंख्याला लटकून गळफास घेत आत्महत्या केली. 


याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. शेजारच्यानी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये दररोज वाद होत होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 


एअरलाईन्स मॅनेजरची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत नोएडात एअरलाईन्स मॅनेजरने (Airlines Manager) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसायड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. विस्तारा एअरलाईन्सच्या मॅनेजरने पार्किंगमध्ये असलेल्या आपल्या कारमध्ये आत्महत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि डुप्लिकेट चावीने कारचा दरवाजा उघडत मृतदेह बाहेर काढला.


पोलिसांना कारमध्ये विषारी औषधाची बाटली आणि सुसाईड नोट सापडली. आयुष्याला कंटाळल्याने आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. मृत तरुणाचं नाव निशांत असं असून तो दिल्लीतल्या कृष्णा नगरमध्ये राहाणार आहे. निशांत आपल्या वडिलांबरोबर राहात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांपासून निशांतचं पत्नीसोबत भांडणं सुरु होतं. ती सहा महिन्याच्या मुलाला घेऊन माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून निशांत नैराश्यात होता. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी निशांतच्या आईनेही आत्महत्या केली होती. या दोन घटनांमुळे निशांत प्रचंड नैराश्यात असल्याचं त्यांच्या मित्रांनी सांगितलं. घटनेच्या दिवशी तो ऑफिसला जाण्यासाठी निघाला. पण पार्किंगमध्ये असेल्या कारमध्येच त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.