Crime News In Marathi: राजधानी दिल्लीत गुन्हांच्या (Delhi Crime) घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भयंकर घटना समोर येत आहे. एका महिला शिपाईच्या हत्येचा उलगडा तब्बल 2 वर्षांनंतर झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करताच आरोपीला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 2021सालची ही घटना असल्याचे समोर आले आहे. (Delhi Crime News In Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला शिपाई आणि हेड कॉन्सेटबल यांच्यात मैत्री होती. दोघांच्यातही जवळीक निर्माण झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर महिलेने हेड कॉन्सेटेबलवर लग्नासाठी दबाव टाकला. महिलेने सतत लग्नासाठी तगादा लावल्यानंतर वैतागलेल्या तरुणाने तिच्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक कट रचला. महिलेला रस्त्यातून हटवण्यासाठी त्याचे प्लान रचून तिची हत्या केली. मात्र, या घटनेची कोणाला कानोकान खबर नव्हती. 


2021मध्ये आरोपीने महिला शिपायाची हत्या केली. हत्येनंतर कोणालाही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह नाल्यात टाकून दिला. गेली दोन वर्ष कोणालाही याबाबत माहिती पडले नाही. शेवटी या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केल्यानंतर या सर्व प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी हेड कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


दिल्ली पोलिस क्राइम ब्रँचने आज हेड कॉन्स्टेबरविरोधात महिला शिपायाची हत्या प्रकरणात अटक केली आहे. या प्रकरणात पोलिस अधिक चौकशी करत आहे. पोलिसांनी 2 वर्षांनंतर महिलेचा मृतदेहदेखील शोधून काढला आहे. मात्र, पोलिसांना महिलेच्या मृतदेहाचा सांगाडच आढळून आला होता. आज या प्रकरणी पोलिस अधिक माहिती जारी करण्याची शक्यता आहे.  


पुण्यात महिलेची फसवणूक


पाण्याच्या टाकीत पैसे टाकल्यास त्याचे 20 पट होतील, असं म्हणत पुण्यातील एका महिलेला 20 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. आरोपींनी 13 सप्टेंबर रोजी 200 लिटरच्या बॅरेल मध्ये वीस लाख रुपये टाकण्यास सांगितले आणि त्यानंतर त्या रूमची लाईट बंद करून त्या ठिकाणी आरोपींनी मोठ्याप्रमाणात धूर केला. तसंच, महिलेला  हरिद्वार येथे जाऊन पूजा करण्यास सांगितलं. तिथली पूजा करुन आल्यानंतर या वीस लाख रुपयांचे बारा दिवसांतच पाच कोटी होतील, असं सांगितले. मात्र, त्यानंतर हे चारही जण वीस लाख रुपये घेऊन निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.