दीराला सांगितलं नवरा मारहाण करतो, त्याने हत्याच केली! नंतर कळलं, प्रकरण भलतंच होतं...
Love Affair News In Marathi: दिराला सांगितलं नवरा मारहाण करतो, दिराने वहिनीच्या सांगण्यावरुन भावाचाच खून केला. उत्तर प्रदेशमध्ये ही घटना घडली आहे.
Love Affair News In Marathi: प्रेम प्रकरण आणि त्यातून घडणारे गुन्हे याचे प्रमाण देशभरात वाढत आहेत. अनैतिक संबंधातून घडणाऱ्या गुन्ह्यातही वाढ होत आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यातून एक खळबळ उडवणारी घडना घडली आहे. पत्नीनेच तिचा दिर आणि त्याच्या मित्रासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे दिरासोबत अफेअर होते. मात्र तिचा पती सातत्याने याचा विरोध करत होता. त्याचबरोबर महिलेला मारहाणदेखील करत होता. सध्या पोलिसांनी आरोपींना अटक केली आहेत. तर, चौकशीत आरोपींनी हत्या केल्याचे कबूलदेखील केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रानू असं मयत व्यक्तीचे नाव आहे. रानू खोलीत झोपलेला असताना काही अज्ञात व्यक्तींनी खोलीत घुसून त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यानच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींनी विक्की आणि सागर यांना अटक केली आहे. पोलिसांनी जेव्हा त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा दोघांनीही नेमकं काय घडलं हे सांगितले.
आरोपीचे नाव विक्की असून पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने कबुलीजबाब दिला आहे. विक्की आणि राणूच्या पत्नीची चांगली मैत्री झाली होती. तेव्हाच राणूच्या पत्नीने त्याला सांगितले की त्याला तुझ्याशी बोललेलं आवडत नाही. तुझ्याशी बोललं की मारहाण करतो. तेव्हा जर त्याचा काटा काढला तर आपलं काम सोप्पं होईल. तेव्हा विक्कीने सागर नावाच्या मित्राची मदत घेऊन एक योजना बनवली. 31 मेच्या रात्री विक्कीने रानू आणि त्याच्या वडिलांना दारू पाजली. तसंच, दोघे झोपल्यानंतर आरोपी त्यांच्या घरात घुसले. विक्की घराबाहेर राखण करत होता तर सागरने आत जावून रानूवर गोळी झाडली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी रानूच्या पत्नीसह इतर दोघा आरोपींनाही अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, सोशल मीडियावरदेखील सध्या याच प्रकरणाची चर्चा आहे. या प्रकरणी रानूच्या वडिलांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनीही लगेचच सर्व प्रकरणाचा शोध घेत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.