Shocking News : विमा पॉलिसीचे पैसे हडपण्यासाठी एका पत्नीने आपल्या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. पण घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पंजाबमधल्या अमृतसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

5 मे रोजी सकाळी मनजीत सिंग हा व्यक्ती पत्नी नरिंदर कौरसह बियास रुग्णालयात औषध घेण्यासाठी गेले होते. पण काहीवेळाने त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह देहरीवाल रस्त्यावर पडलेला आढळून आला. त्याची पत्नीही जखमी होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मनजीत सिंगचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तर जखमी पत्नीला उपचारासाठी शासकीय रुग्णलयात दाखल केलं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला.


तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. मृत मनजीत सिंग हे गेल्या 20 वर्षांपासून आजारांनी त्रस्त होते. त्यांच्यावर बियास इथल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. पतीच्या आजारपणामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि घराचा उदरनिर्वाह चालवण्यात मोठ्या अडचणीत होत होता. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणंही होत होती.


मृत मनजीत सिंग यांची पत्नी एलआयसी एजंट होती. तिने पतीचा 15 लाखांचा विमा उतरवला होता. नॉमिनी ती स्वतः होती. पतीचा मृत्यू झाला तर विम्याचे सर्व पैसे आपल्याला मिळतील असा विचार तिच्या डोक्यात आला. त्यानंतर तीने पतीच्या हत्येचा कट आणखण्यास सुरुवात केली.
5 मे रोजी औषध घेण्यासाठी ती पतीला घेऊन दवाखान्यात गेली. 


रस्त्यावर कोणी नसल्याची संधी साधत तीने पतीवर शस्त्राने हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तीने स्वत:लाही जखमी करुन घेतलं. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चोरीच्या उद्देशाने काही अज्ञातांनी आमच्यावर हल्ला केल्याचा बनाव तीने केला. 


पण पोलिसांच्या चौकशीत अखेर तिचं बिंग फुटलं. पोलिसांनी आरोपी नरिंदर कौरला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.