मुंबई : प्रेमासाठी लोकं काहीही करायला तयार होतात. प्रेमात बुडालेल्या व्यक्तीला काय चुकीचे आणि काय बरोबर हे कळत नाही. त्यामुळे लोकं जे वाटेल ते करतात. अशीच एका वेड्या प्रेमाची घटना समोर आली आहे. ज्यामध्ये प्रियकर आपल्या प्रेयसीच्या प्रेमात असे काही पाऊल उचलले आहे, की असा तुम्ही कधी विचार देखील करणार नाही. या प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्याकरुन तिचे डोकं कापून आपल्या जवळ पिशवीत ठेवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर तो जिथे जायचा तिकडे तो आपल्य़ा प्रेयसीचे डोकं घेऊन फिरायचा. यानंतर ग्रामस्थांनी आरोपीवर संशय येताच त्याने ही पिशवी तशीच ठेवली आणि तेथून पळून गेला.


त्यानंतर ग्रामस्थांकडून माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि ती पिशवीमधील महिलेचं डोकं पाहून थक्कं झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून त्याला अटक केली आहे.


झारखंडच्या जमशेदपूर येथून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे जमशेदपूरला लागून असलेल्या सरायकेला येथील चांदिल निमडीह पोलिस स्टेशन भागात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचे डोकं तिच्या धडापासून कापले असल्याची घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव सविता कुमारी आहे. ही महिला चार वर्षापूर्वी घरातून पळून आरोपी गिडू गोपसोबत राहत होती. परंतु नंतर या दोघांमध्ये असे काय घडले हे अद्याप समोर आलेले नाही.


पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता या प्रकरणातील अनेक खुलासे झाले. पण आरोपीनी हा खून का केला? त्याचे कारण त्याने सांगितले नाही. परंतु त्यानंतर हा आरोपी युवक मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


सरायकेलामधील ही पहिलीच घटना नाही, याआधीही देखील एका मानसिक रूग्णाने एका महिला शिक्षिकेच्या घरात घुसून तिचे डोकं कापले. यानंतर तो माणूस महिलेचे डोक घेऊन उघडपणे फिरत असल्याचे आढळले.