Crime News : डेटिंग अॅपवरुन  (Dating App) भेटणं एका महिलेला चांगलाच महागात पडलं आहे. दिल्लीतील द्वारका भागातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिलेसोबत कथित बलात्कार (Rape in Delhi) झाल्याची घटना समोर आली आहे. डेटिंग अॅपच्या माध्यमातून आरोपी आणि पीडिता संपर्कात आले. आरोपी हैदराबादचा रहिवासी असून तो सध्या फरार आहे. आरोपींच्या शोधात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शोध मोहिम सुरु केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना 3 जूनची असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. आरोपी आणि पीडितेमध्ये डेटिंग अॅपच्या माध्यमातून मैत्री होती. आरोपीने महिलेला द्वारका इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तो तिथून फरार झाला. या घटनेने हादरलेल्या महिलेने दिल्लीत पोलिसांत तक्रार दाखल केली. 


तीन दिवसांआधी टिंडरवर ओळख
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सोशल मीडिया अॅप टिंडरवर मोहक गुप्ता नावाच्या व्यक्तीसोबत पीडित महिलेची मैत्री झाली होती. तीन दिवसांनंतर म्हणजे 3 जूनला आरोपीने महिलेला द्वारका इथल्या हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. हॉटेलमध्ये झालेल्या भेटीदरम्यान त्याने तिला कोल्ड्रींग दिलं.


कोल्ड्रींग प्यायालयानंतर महिला बेशुद्ध झाली, याचा फायदा घेत आरोपीने महिलेवार बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता आरोपींनी पीडितेला मेट्रो स्थानकाबाहेर सोडलं. तेव्हापासून त्याचा फोन बंद आहे.