मृत्यूच्या दाढेतून परत येणं म्हणजे काय ते हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल
नदीत पोहोणाऱ्या तरुणावर मगरीचा हल्ला, मगरमिठीतून `तो` असा सुटला पाहा व्हिडीओ
मुंबई: आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात त्याची कल्पनाही आपल्याला नसते. अनेक तरुणांना पोहायला आवडतं. गावात अनेक ठिकाणी पोहोणं हा खेळ समजला जातो. मुलं या खेळात आनंदाने सहभागी होत असतात. हा तरुण पोहोण्याचा आनंद घेत असताना अचानक असं काही घडलं ज्याची स्वप्नातही कल्पना त्याने केली नसेल. तरुण पोहत नदीकाठी येत असताना अचानक मगरीनं त्याच्यावर हल्ला केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हा व्हिडीओ ब्राझीलचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना जिथे घडली ती जागा टुरिस्ट प्लेस म्हणून खूप जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे अशा ठिकाणी मगर आल्याची माहिती मिळताच खळबळ उडाली. मगर आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिथे जाण्यासाठी आता बंदी घालण्यात आली आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुण पोहत आहे. तो नदीकिनारी येत असताना अचानक त्याच्यावर मगर हल्ला करते. हा तरुण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. तिच्या तावडीतून सुटून तो पोहोत पटकन किनाऱ्यावर पोहोचतो. अक्षरश: मगरीच्या तावडीतून हा तरुण आपला जीव वाचवून किनाऱ्यावर पोहोचतो.
या तरुणाला थोडी जखम झाल्याचं दिसत आहे. मगरीनं तरुणाच्या हाताचा चावा घेतला. या तरुणाचा हात रक्तबंबाळ झाला. मात्र त्याचा जीव वाचला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 1400 हून अधिक लोकांनी रिट्वीट केलं आहे.