नवी दिल्ली : आयटी मंत्रालयाच्या सामान्य सेवा केंद्र अर्थात सीएससी (Common Service Centre) च्या वेबसाईटवर लवकरच बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' कंपनीची उत्पादनं दिसली तर आश्चर्य नको.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पतंजलीसोबतच खत कंपनी 'इफको' आणि सॉफ्टवेअर कंपनी 'टेली सोल्यूशन्स'च्या उत्पादनांना विक्रीसाठीही हे सरकारी प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. 


केंद्र सरकारला सामान्य सेवा केंद्रांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याची इच्छा आहे. यासाठी विविध सेवांच्या आधारे सरकार लोकांशी जोडलं जाणार आहे. यासाठी, 'डिजीटल पेमेंट'च्या माध्यमातून पानी, वीज, गॅस, मोबाईल आणि डीटीएचचं बिलंही तुम्हाला या सेवांच्या आधारे भरता येणार आहेत. 


यासाठी, सीएससी इंडियानं इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) च्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांसाठी सेवा पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रवेश अर्ज जमा करणे, ऑनलाईन नोंदणी करणे आणि ऑनलाईन परतावा देण्यासारख्या सुविधा देण्यासाठी एक करार केलाय.


या करारानंतर पतंजलीच्या आचार्य बालकृष्ण यांनी ग्रामीण भागात योग शिकवण्यासाठी पतंजली योगपीठात सीएससी, व्हीएलईला मोफत वर्ग घेण्याची घोषणा केलीय.