नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आलेलं आहे. काही दिवसात हे लॉकडाऊन 4 संपणार आहे. पण पुन्हा लॉकडाऊन वाढणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात कायम आहे. तर दुसरीकडे मात्र हिमाचल प्रदेशने आपल्या रेड झोन जिल्ह्यांमध्ये 30 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत त्या भागात हा लॉकडाऊन असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या डेप्युटी कमिश्‍नर यांना लॉकडाऊनची वेळ ठरवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. आपल्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची परिस्थितीनुसार ते निर्णय घेऊ शकतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमाचलमध्ये कोरोनाचे आतापर्यंत 203 रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 63 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्‍यात सध्या 137 रुग्ण उपचार घेत आहेत.


लॉकडाऊनमध्ये ही देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली. देशात आतापर्यंत 1 लाख 38 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 6,977 रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या 1,38,845 वर पोहोचली आहे. देशाता आतापर्यंत 4,021 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 154 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवार देशात कोरोनाचे 6767 रुग्ण वाढले होते. 57,721 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 41.57 टक्के आहे.