Wedding Viral Video: भारतीय लग्नांमध्ये वर आणि वधूचा लग्नमंडपातील प्रवेश हा लग्नाइतकाच थाटामाटात करण्याची प्रथा आहे. भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये वर आणि वधूचं मंडपात स्वागत करण्याची पद्धत वेगवेगळी असते. अशीच एक पद्धत सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ट्विटरवर अक्षर पटेल (@akshayhspatel) नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एका लग्न सोहळ्यादरम्यान ज्या घरात लग्न आहे त्या घरातील लोक घराच्या गच्चीवरुन लाखो रुपयांच्या नोटा खाली उधळताना दिसत आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हा व्हायरल व्हिडीओ गुजरातमधील केकरी तालुक्यातील सेवडा अगोल गावातील आहे.


कोणाचं लग्न होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार सरपंचाच्या भाच्याच्या लग्नामधील हा व्हिडीओ आहे. लग्न असलेल्या घरातील लोक आनंद साजरा करण्यासाठी गच्चीवरुन नोटा उधळत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नोटांचा हा पाऊस पाहून अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांनी अशापद्धतीने पैसा उधळणे किंवा दौलतजादा करणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे.


500 रुपयांच्या नोटा उधळल्या


वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार गावाच्या माजी सरपंचाच्या मुलाच्या लग्नाच्या सोहळ्यादरम्यान हा प्रकार घडला. या व्हिडीओमध्ये सरपंचाच्या घरातील लोक बाल्कनी आणि गच्चीवरुन 10 रुपये आणि 500 रुपयांच्या नोटा उधळताना दिसत आहे. हे लोक नोटांचे बंडलमधील नोटा एक एक करुन उडवताना दिसतात. घराखाली काही लोक या नोटा गोळा करतानाही दिसत आहेत. लाऊड स्पीकरवर लावलेल्या गाण्यांवर नचता नचता घरासमोर उभे असलेले लोक या नोटा गोळा करताना दिसतात. 



अशाचप्रकारे उधळलेले 50 लाख रुपये


हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. गुजरातमध्ये अशाप्रकारे नोटा उधळण्याची पद्धत फार जुनी आहे. अनेक शुभ कार्यक्रमांमध्ये, गाण्यांच्या कार्यक्रमांमध्ये अशाप्रकारे नोटा उधळल्या जातात. काही वर्षांपूर्वी असाच एक प्रकार राज्यातील वलसाडमध्ये घडला होता. येथील एका चॅरिटी प्रोग्रामदरम्यान गायकांवर तब्बल 50 लाख रुपयांची रोख रक्कम दौलतजादा म्हणून उधळण्यात आलेली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रसिद्ध गायिका गीता राबर आणि वृजरादान गढवी यांच्या एका कार्यक्रमामध्ये लोकांनी 10, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा उधळल्या होत्या. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.