मुंबई : निवार चक्रीवादळ (Cyclone Nivar) रात्री अडीचच्या सुमारास पुदुच्चेरीच्या समुद्र किनाऱ्यावर धडकले. समुद्रकिनारी धडकल्यानंतर या वादळाची तीव्रता कमी झाली आहे. सध्या १२० किमी प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत. निवार चक्रीवादळ गेल्या सहा तासांत १६ किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेने पुढे सरकले आहे. भारतीय हवामान विभागाने  Indian Meteorological Department (IMD)धोक्याचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अहवालानुसार, कुडलोरच्या (तामिळनाडू)  Cuddalore (Tamil Nadu) पूर्वे-दक्षिणपूर्व आणि पुदुच्चेरीला धोका असल्याचे म्हटले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'निवार' चक्रीवादळाचा ( cyclone nivar ) तडाखा बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ हे सध्या पुदुच्चेरीपासून ४० किलोमीटर आणि कुड्डलोरच्या दक्षिण-पूर्वेस ५० किलोमीटर अंतरावर आहे. पुढील तीन तासांत ते पुदुच्चेरीला धडकेल, अशी शक्यता आहे. वादळाचा वेग हा १६ किमी प्रतितास इतका आहे. या चक्रीवादळाने १४५ किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहून शकतात, अशी माहिती भारती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.



दरम्यान,  वादळ धडकल्यानंतर आता पुदुच्चेरी (Puducherry), तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू झाला आहे. निवार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरही केले आहे. गुरुवारीही पावसाचा जोर कायम राहील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. मदत आणि बचाव कार्यांसाठी आयएनएस 'ज्योती' ही नौका तामिळनाडूत स ज्ज आहे. तर आयएनएस सुमित्रा विशाखापट्टणमहून रवाना झाली आहे.