नवी दिल्ली : तौक्ते चक्रीवादळानंतर आणखी एक चक्रीवादळामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी हे चक्रीवादळ येऊ शकतं त्या ठिकाणी सुरक्षेचं नियोजन करण्याच आलं आहे. याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसह अंदमान निकोबार बेटचे उपराज्यपाल यांच्यासमवेत बैठक घेतली आणि यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तयारीचा आढावा घेतला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही आज बैठकीच्या माध्यमातून तयारीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या किनारपट्टी भागात तैनात करण्यासाठी एनडीआरएफच्या 7 तुकड्या पुण्याहून भुवनेश्वर येथे पाठवण्यात आल्या आहेत.


- ज्येष्ठ शास्त्रज्ञ उमाशंकर दास म्हणाले की, '25 मे पर्यंत अत्यंत तीव्र चक्रीवादळात हे बदलू शकते. यामुळे पारादीप आणि सागर बेटातील किनारपट्टीला हे धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पारादीप व धमरा यांना इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वाऱ्याची गती ही 120 च्या पुढे असण्याची शक्यता आहे.


- एनडीआरएफने ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि अंदमान निकोबार बेट या ठिकाणी एकूण 99 तुकड्या तैनात केले आहेत. एनडीआरएफचे डीजी एस.एन प्रधान यांनी ही माहिती दिली.


- याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांसह अंदमान निकोबार बेटचे उपराज्यपाल यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून यास चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेतील. 


- यापूर्वी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा सोमवारी सर्व राज्यांच्या खासदारांशी चर्चा करतील. आज संध्याकाळी 5.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक आयोजित केली जाईल.


या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता, सशस्त्र दल पूर्णपणे तयार आहे. शनिवारी सकाळी बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रात डिप्रेशन पाहिलं गेलं. आणि सोमवारी सकाळी ते यास चक्रीवादळमध्ये बदलले. हवामान खात्याचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. आयएमडीच्या अंदाजानुसार या चक्रीवादळाचा वेग 155-165 किमी प्रतितास असेल तर वेग वेग 185 किमी प्रतितास वाढू शकेल. महापात्रा म्हणाले की, 'हे वादळ एक भयानक रूप घेऊ शकतं.. 26 मे रोजी संध्याकाळी पश्चिम बंगालमार्गे उत्तर ओडिशा किनाऱ्यावर हे वादळ धडक देईल.