मुंबई : चक्रीवादळ Yaasने आज आपल्या दिशेमध्ये बदल केला आहे आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडक दिली आहे. ताशी 150 किमीच्या वेगाने वाहत आहेत. त्याचवेळी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे पश्चिम बंगाल ( West Bengal)आणि ओडिशा  (Odisha) सरकारने 12 लाखाहून अधिक लोकांना धोकादायक भागातून सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. हे चक्रीवादळ आता उत्तर-उत्तर पश्चिम फिरु शकते आणि तिची तीव्रता अधिक असू शकते, असा इशारा देण्यात आला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओडिशा आणि पश्चिम बंगालला ‘रेड कोडेड’ अलर्ट (Red coded alert)जारी करण्यात आला आहे. उत्तर पश्चिम आणि बंगालच्या खाडीत जोरदार वेगाने वारे वाहत आहेत. (Cyclone Yaas in India) हे वारे  ताशी 150 किमीच्या वेगाने वाहत आहेत. याचा जोरदार तडाखा किनारपट्टीवरील गावांना बसला आहे. दरम्यान, वादळासह जोरदार पाऊस पडत आहे.



वृत्तानुसार, भारतीय हवामान विभागाचे मौसम विज्ञान विभागाचे (India Meteorological Departement) महानिदेशक एम. महापात्र यांनी सांगितले की, ओडिशा आणि पश्चिम बंगालसाठी ‘रेड कोडेड’चा इशारा देण्यात आला आहे. महापात्रा म्हणाले की, भारतातील चक्रीवादळ Yaas उत्तर पश्चिम आणि बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र चक्रीवादळात रुपांतरीत झाले आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की चक्रीवादळा दरम्यान वाऱ्याचा वेग 155 ते 165 किमी / तासापर्यंत असेल आणि तो 185 किमी / तासापर्यंत पोहोचू शकेल.



चक्रीवादळाच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) म्हटले आहे की कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे बुधवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी  7:45 दरम्यानचे कामकाज रद्द केले जाईल. त्याचप्रमाणे भुवनेश्वरचे बिजू पटनाईक विमानतळ मंगळवारी सकाळी 11 ते गुरुवार पहाटे 5 वाजेपर्यंत बंद राहील. दक्षिण पूर्व रेल्वेनेही अनेक गाड्या रद्द केल्याची घोषणा केली आहे.


 चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, शेजारच्या झारखंडनेही  (Jharkhand also issued an alert) सतर्कतेचा इशारा दिला असून चक्रीवादळाचा परिणाम लक्षात घेता तयारी सुरू केली जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, त्यांच्या प्रशासनाने नऊ लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. त्याचबरोबर ओडिशा सरकारचे म्हणणे आहे की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी किनारी जिल्ह्यातील तीन लाखाहून अधिक लोकांना बाहेर काढले आहे.


भुवनेश्वर प्रादेशिक हवामान केंद्राचे वैज्ञानिक डॉ. उमाशंकर दास यांनी सांगितले की, ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यात धमरा आणि चांदबली दरम्यान चक्रीवादळाची टक्कर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाले की बंगालमधील या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी  74,000हून अधिक अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त दोन लाखाहून अधिक पोलीस आणि नागरी स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. ते म्हणाले की राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद बल (SDRF) जवान तैनात करण्यात आले असून गरज भासल्यास सैन्याचीही मदत घेतली जाईल.