मुंबई : कर्नाटकच्या आयपीएस अधिकारी (IPS Officer) डी रूपा मोदगिल (IPS D Roopa Moudgil) नेहमीच त्यांच्या कामाबद्दल चर्चेत असतात. कर्नाटक केडरच्या 2000 बॅचच्या आयपीएस अधिकारी डी रूपा (D Roopa) या जेलमधील एआयडीएमकेच्या (AIDMK) नेत्या शशिकला यांच्या व्हीआयपी उपचारांच्या खुलाशापासून ते तत्कालीन  मुख्यमंत्री उमा भारती यांच्या अटकेपर्यंत प्रत्येक गोष्टीत सहभागी आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


डी रूपा  (D Roopa) कर्नाटक केडरच्या 2000 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी होमगार्डमध्ये अतिरिक्त अधिकारी आणि नागरी संरक्षणमध्ये अतिरिक्त कमांडंट म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी वाहतूक आणि रस्ता सुरक्षा विभागात आयुक्त आणि कर्नाटक कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक पदही भूषवले आहे. डी रूपा या देशातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. त्यांना 2013 मध्ये पोलीस विभागात सायबर क्राईमची कमांड देण्यात आली होती. डी रूपा एक कडक पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे नाव घेतल्यानंतर अनेक गुंड तसेच गुन्हेगार थरथर कापतात.



डी रूपा (D Roopa) यांचा जन्म कर्नाटकातील देवनागेरे येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण येथूनच केले. त्यांचे वडील जे.एस. दिवाकर हे अभियंता होते, जे आता निवृत्त झाले आहेत. डी रूपा ने कुवेम्पू विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आणि सुवर्णपदक जिंकले. यानंतर त्यांनी बंगलोर विद्यापीठातून मानसशास्त्रात एम.ए. केले. एमएनंतर त्यांनी नेट-जेआरएफ परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याचा ध्यास घेतला.



डी रुपा (D Roopa) यांनी वयाच्या 24 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि अखिल भारतात 43 वा रँक मिळवला. यानंतर त्यांना आयएएस बनण्याची संधी मिळाली, पण त्यांनी पोलीस सेवेची निवड केली, कारण आयपीएस अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न होते.



डी रूपा (D Roopa) यांची ओळख एक कडक पोलीस अधिकारी म्हणून झाली असली तरी त्यांनी एका मुख्यमंत्र्याला अटकही केली आहे. 2004 मध्ये मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री उमा भारती यांच्याविरोधात 10 वर्ष जुन्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. खरं तर, 15 ऑगस्ट 1994 रोजी कर्नाटकच्या हुबळी येथे उमा भारतींनी ईदगाहवर तिरंगा फडकवला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर जातीय सलोखा बिघडवल्याचा आरोप झाला होता. हुबळी न्यायालयाकडून वॉरंट बजावण्याच्या वेळी डी रूपा कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्याच्या एसपी होत्या आणि वॉरंट मिळताच त्या मुख्यमंत्री उमा भारती यांना अटक करण्यासाठी मध्य प्रदेशला रवाना झाली. मात्र, उमा भारती यांनी अटकेपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.



2017 मध्ये जयललिता यांचा पक्ष AIADMK नेत्या VK शशिकला तुरुंगात होत्या आणि D Roopa जेल विभागात DIG म्हणून तैनात होत्या. शशिकला ठेवलेल्या तुरुंगाला त्यांनी भेट दिली. यानंतर, डी रूपाने एक अहवाल सादर केला, ज्यामध्ये शशिकलाला तुरुंगात व्हीआयपी उपचार दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यांनी खुलासा केला की शशिकला यांना पाच कारागृहाएवढा व्हरांडा आणि स्वतंत्र स्वयंपाकघर देण्यात आले होते. रूपा यांनी आरोप केला होता की या सर्व सुविधांच्या बदल्यात तुरुंग अधिकाऱ्यांना 2 कोटी रुपये देण्यात आले आहेत.



आयपीएस अधिकारी असण्याव्यतिरिक्त, डी रूपाकडे इतर अनेक प्रतिभा आहेत. ती एक उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना आहेत आणि त्यांनी भारतीय संगीताचे प्रशिक्षण देखील घेतले आहे. त्यांनी कन्नड चित्रपट बयालाताड़ा भीमअन्नामध्ये पार्श्वगायिका म्हणून काम केले आहे. या व्यतिरिक्त, डी रूपा एक शार्प शूटर आहे आणि त्यांनी शूटिंगमध्ये अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत.