केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर, महागाई भत्त्यात वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ टक्क्यानं वाढ करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ टक्क्यानं वाढ करण्यात आली आहे.
आता विविध सणांच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना केंद्राकडून गिफ्ट मिळाले आहे. केंद्र सरकारनं महागाई भत्ता चार टक्क्यांवरून पाच टक्के केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला आहे. वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.