मुंबई : सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ दिवसाला अपलोड होत असतात. पण त्यातील काहीच व्हिडीओ आणि त्या व्हिडीओतील माणसं आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतात. असेच एक आहेत डब्बू अंकल. डब्बू अंकल पुन्हा एकदा आपल्या व्हिडीओमुळे चर्चत आले आहेत. (Dabbu Uncle is Back, Dance Video with Aunty on Aap Ke Aa Jane Se Khudgarz movie song ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर डान्स व्हिडियो खास करून चांगलेच वायरल होतात. काही डान्सर्स खरोखर खूप टॅलेंटेड असतात, मात्र त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. असेच आहेत डब्बू अंकल. आता माघील काही काळापासून इंटरनेटमुळे डब्बू अंकलचं डान्स टॅलेंट सगळ्यांसमोर आलं आहे. 



मध्य प्रदेश येथील विदिशा मध्ये राहणारे, प्रोफेसर संजीव श्रीवास्तव उर्फ डब्बू अंकल यांच्या डान्सचा तो व्हिडियो व्हायरल झाला आहे. डब्बू अंकल यांनी धमाकेदार कमबॅक केलं आहे. 


डब्बू अंकल यांनी आपल्या व्हिडियोमधून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. आणि आता पुन्हा एकदा ते चर्चेमध्ये आले आहे. २०१८ मध्ये एका लग्नात त्यांनी केलेल्या डान्सचा व्हिडियो चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्यावेळी ते अक्षरशः इंटरनेट सेन्सेशन बनले होते. आता याच डब्बू अंकलच्या अजून एक व्हिडियो पुन्हा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. ‘मैं से मीना से ना साथी से’ या गाण्यावर त्यांनी या व्हिडियोमध्ये आपल्या बायकोसोबत डान्स केला आहे.


पुन्हा एकदा आपल्या भन्नाट आणि हटके स्टाईलमध्ये त्यांनी हा डान्स परफॉर्मन्स दिला आहे. आकृति डिजिटल स्टूडियोच्या माध्यमातून हा व्हिडियो युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे. अपलोड होताच या व्हिडियोला 40 लाखांहून अधिक व्युव्ज आहेत.त्यांच्या या परफॉर्मन्सला आतापर्यंतचा सर्वात उत्तम डान्स म्हणून सगळे कमेंट करत आहेत.