नवी दिल्ली : पेट्रोल  डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. देशात कोरोनामुळे आर्थिक संकट निर्माण झालं आहे. त्यात भर म्हणजे पेट्रोल डिझेलचे सतत वाढणारे भाव सामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसवणारे आहेत. दरम्यान पेट्रोलचे दर ८७ रूपयांवर पोहोचले आहेत, तर डिझेलचे दर ८० रूपयांच्या घरात पोहोचले आहे. रविवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात ३५ पैसे तर डिझेलच्या दरांत ६० पैसे प्रती लिटर प्रमाणे वाढ केली आहे.  या पंधरा दिवसांमध्ये पेट्रोलचे दर ७.९७ रूपये तर डिझेल ८.८८ रूपयांनी वाढले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत आहे. तरी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर ७९.२३ रूपये प्रती लिटर आहे.  तर डिझेल ७८.२७ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. मुंबईत पेट्रोल डिझेलचे दर अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत  पेट्रोलचे आजचे दर ८६.०४ रूपये प्रती लिटर आहे.  तर डिझेल ७६.६९ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे.


चेन्नई आणि कोलकातामध्ये पेट्रोलचे दर क्रमशः ८२.५८ रूपये आणि ८०.९५ प्रती लिटर आहे. डिझेलचे दर क्रमशः ७५.८० रूपये  आणि ७३.६१ रूपये प्रती लिटर आहे. रोज सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलचे दर बदलतात. देशात पेट्रोल आणि डिझेलवरील कर ६९ टक्के झाला आहे. 


रोज बदलणारे पेट्रोल डिझेलचे दर तुम्ही एका SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेवू शकता. इंडियन ऑयलचे ग्राहक RSP लिहून ९२२४९९२२४९ या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेवू शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून ९२२३११२२२२ तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून ९२२२२०११२२  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेवू शकतात.