नवी दिल्ली : RBI Rules: Damaged currency notes exchange rules : तुमच्याकडे फाटलेल्या नोटा आहेत का ? तुमच्याकडे फाटलेल्या, कोपरे दुमडलेल्या नोटा असतील तर त्या आता रद्द होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांनुसार आता नोटांची फिटनेस टेस्ट होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकवेळा लोकं फाटलेल्या नोटा चिटकवून चालवण्याचा प्रयत्न करतात, परंतू आता याला आळा बसेल, नोटांच्या फिटनेस टेस्टसाठी आता एक नवं मशिन वापरलं जाणारेय. या नोटा तपासण्यासाठी बँकेला वेगळे नियम घालून दिलेत.  


दरम्यान, बँकेने नोटा बदलून देण्यास नकार दिल्यास ऑनलाइन तक्रार नोंदवता येईल. त्यानुसार बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे बँकांना नोटा बदलू देणं बंधनकारक आहे.


नवीन नियम काय आहेत?


- नोट जितकी वाईट तितकी तिची किंमत कमी असेल.
- जर एखाद्या व्यक्तीकडे 20 पेक्षा जास्त खराब झालेल्या नोटा असतील आणि त्यांची एकूण रक्कम 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यासाठीचे व्यवहार शुल्क आकारले जाईल.
- बदली करण्यासाठी जाण्यापूर्वी नोट सुरक्षा चिन्हे दर्शवते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.