Crime News In Marathi Today: नवरात्रौत्सवात देशात मोठ्या प्रमाणात गरबा खेळला जातो. गुजरातसह देशातील अनेक राज्यांत गरबा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हरियाणातील फरीदाबाद येथील एका सोसायटीत गरबा कार्यक्रमाच्या दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. गरबा खेळताना झालेल्या धक्काबुक्कीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News Today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रिंसेस सोसासयटीमध्ये गरबा आयोजित केला होता. गरबा खेळण्यासाठी सोसायटीतील सर्व जण सहभागी झाले होते. तर, परिसरातील इतर लोकही कार्यक्रमात पोहोचले होते. त्याचदरम्यान गरबा खेळण्यासाठी आलेले दोन मुलं एका 25 वर्षीय मुलीसोबत गैरव्यवहार करत होते. तिच्याकडे जबरदस्ती नंबर मागत होते. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी याचा विरोध केल्यानंतर दोन मुलांनी तिचे आई-वडिल आणि भावासोबत धक्काबुकी करण्यास सुरुवात केली. धक्का लागताच मुलीचे वडील खाली कोसळले असून बेशुद्ध झाले. 


मुलीचे वडील बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. कुटुंबीयांनी दोन्ही मुलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच, धक्काबुक्की, मारहाण आणि मुलीचा नंबर मिळवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की, फरीदाबादमधील 87 प्रिंसेस सोसायटीत गरबा खेळताना एका 50-52 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 


कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन मुलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटलं आहे की, सोसायटीत राहणारे दोन मुलं त्यांच्या मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर आम्ही त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यावर वाद घालण्यास सुरुवात केली. तेव्हा धक्काबुक्कीत एका व्यक्तीला धक्का लागून तो खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणात पुढील तपास करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे. यात स्पष्टपणे दिसत आहे की काही लोक भांडण करत आहेत.