मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. सोशल मीडियावर काय कधी ट्रेंड होऊ लागेल, हे कोणालाच सांगता येणार नाही. लोक येथे प्रसिद्धीसाठी काही वाटेल ते करण्याची देखील तयारी दाखवतात. ज्यामुळे ते आपल्या जीवाची पर्वा देखील करत नाहीत. तर काही असे लोक देखील असतात, ज्यांना खोडी करण्याची खूप सवय असते. ज्यामुळे ते बऱ्याचदा दुसऱ्याचं नुकसान करतात. परंतु याचं फळ त्यांना देखील नक्कीच मिळतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हटलं जातं की, आग, पाणी आणि वायूशी कधीही खेळू नये. ते कधी उलट फिरु शकतात आणि असंच एका तरुणासोबत घडलं. सध्या या संदर्भात एक असाच व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहू तुमच्या तोंडातून ''इन्संट कर्मा'' हा शब्द नक्कीच आठवेल.


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गाडीच्या आत बसलेले तरुण मिळून फटाका जळवत असतात. परंतु ते नुसतंच फटाका जळवत नाही, तर ते फटाका आपल्या हातात पेटवतात आणि रस्त्यावर तो फेकतात.  परंतु काही सेकंदात तो फटाका रॉकेटसारखा उडू लागतो आणि उडत असतानाच तो त्या व्यक्तीच्या कारमध्ये घुसतो.



यानंतर कारच्या आत मोठा आवाज होतो आणि कारच्या आत आग लागते. यामध्ये व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला काहीही होत नाही, परंतु गाडीच्या आत बसलेल्या व्यक्तीसोबत मोठा अपघात घडला असणार हे नक्की.


अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर द डार्विन अवॉर्ड्स नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 80 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी व्हिडीओला लाईक करून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.