मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीला रोखण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्याची घोषणा केली आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया 28 एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि लसीकरण 1 मेपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की, राज्य सरकार आणि खासगी रुग्णालये 50 टक्के लस खरेदी करू शकतात. त्यात आता बर्‍याच राज्यांनी विनाशुल्क लस देण्याची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपर्यंत भारतात कोट्यवधी लसींना मंजुरी देण्यात आली आहे. लसीकरणाच्या आकडेवारीवरून हे ही समजले जात आहे की, यामुळे गंभीर स्तराच्या आजाराशी सामना करण्यास मदत होणार आहे. परंतु असे असूनही, लसींबद्दल योग्य माहिती नसल्याने बरेच लोक अजूनही लस घेण्यासाठी संकोच करत आहेत. त्याच्या मनात असे अनेक भ्रम आहेत, ज्यामुळे लसी घ्यायची की, नाही? असे प्रश्न त्यांना पडतात.


आज आम्ही तुम्हाला यासंबंधित काही अफवां आणि त्यामागचे सत्य सांगणार आहोत


1. अफवा: कोरोना विषाणूमुळे बरे झाल्यानंतर लस घेण्याची गरज नाही.


सत्यः कोरोना विषाणूपासून बरे झालेल्या लोकांना पुन्हा कोविड -19 ची सागण होणार नाही दे ठोस पद्धतीने सांगता येणे शक्य नाही. एकदा संसर्ग झाल्यामुळे, शरीरात अँन्टीबॅाडिज तयार होतात, ज्यामुळे भविष्यात होणार्‍या संक्रमणाशी लढायला मदत होते. त्याला नैसर्गिक प्रतिकारशक्ती म्हणतात.


परंतु काही काळानंतर ते कमी होतात. लसीच्या मदतीने, आपली रोगप्रतिकार शक्तीला नवीन व्हायरस ओळखण्यास मदत करते आणि पुढच्या वेळी विषाणू शरीरात जाईल तेव्हा ते त्याला ओळखून लढा देण्यास मदत करते.


2. अफवा: लस लवकरच तयार झाली आहे. तर ती सुरक्षित आहे का?


सत्य: मंजूरी झालेल्या लसीं सुरक्षित आहे. हे खरे आहे की, शास्त्रज्ञांनी रेकॉर्ड वेळेत बर्‍याच लसीं तयार केल्या आहेत. परंतु केवळ अन्न आणि औषध प्रशासनाने मंजूर केलेली लस, जी माणवी शरिरासाठी प्रत्येक दृष्टीने सुरक्षित आहे. लस तयार करण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक छोट्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष दिले गेले आहे. त्यामुळे कोणत्याही शंके शिवाय तुम्ही लस घेऊ शकता.


3. अफवा: लसमुळे कोरोना विषाणूची लागण होऊ शकते.


सत्यः कोविड -19 लस लावल्यामुळे आपल्याला संसर्ग होणार नाही. यापैकी कोणत्याही लसीमध्ये कोरोना व्हायरस लाइव्ह किंवा जिवंत व्हायरस वापरला गेलेला नाही. काही प्रकरणांमध्ये या लसी घेतल्यानंतर तापाची लक्षणे जाणवू शकतात. परंतु तज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की, हे सामान्य आहे आणि यामुऴे शरीरात रोग प्रतिकारकशक्ति तयार केली जाते


4. अफवा: कोविड -19 देखील फ्लू विषाणूच्या प्रकारामुळे होतो, त्यामुळे फ्लूवर लस लावल्याने काम होईल.


सत्यः तज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की गेल्या वर्षी कोविड -19 वर केलेल्या उपाययोजनांमुळे सामान्य सीझनमध्ये फ्लू झालेला नाही. त्यामुळे कोविड -19 आणि फ्लूसाठी समान लस वापरली जाणार नाही. फ्लू टाळण्यासाठी स्वतंत्र लस आहे, तर कोविड -19 साठी वेगळी लस आहे.


5. अफवाः लस लागू झाल्यानंतर कोविड -19 खबरदारी घेण्याची गरज नाही


सत्यः कोणतीही लस मानवांसाठी तोपर्यंत सुरक्षित असू शकत नाही, जोपर्यंत संपूर्ण लोकसंख्या आणि इतर लस वाहक त्यापासून सुरक्षित राहत नाहीत. स्मॉलपॉक्स म्हणजेच देवीच्या बाबतीतही असेच झाले होते. 1977 पर्यंत, देवीची शेवटची लस लावण्यात आली आणि त्यानंतर 1980 मध्ये जाहीर केली गेले की, आता हा देवीचा संसर्ग पूर्णपणे संपला आहे.


आता हे अमेरिका आणि रशियाच्या प्रयोगशाळांमध्ये गोठविलेल्या नमुन्यांमध्ये उपलब्ध आहे. कोरोना विषाणूबद्दल, जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हटले आहे की, प्रत्येकाला लस देईपर्यंत आपण या संसर्गापासून पूर्णपणे सुरक्षित राहू शकत नाही. अशा परिस्थितीत, लसघेतल्यानंतरही आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे.


 1. कोरोना विषाणू टाळण्यासाठी, आपल्याला चांगल्या प्रतिचा मास्क घालण्याची आवश्यकता आहे.
2. मास्क अशा प्रकारे घातला गेला पाहिजे जेणेकरून नाक आणि तोंड चांगले झाकले जाईल
3. कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा
4. वारंवार हात धुवा. डोळे, तोंड, नाकाला सारखे स्पर्श करू नका.
5. हात सॅनिटायझर आणि साबण वापरा, सामाजिक अंतराच्या नियमांचे अनुसरण करा.