Bihar News : पेट्रोल किंवा डिझेल संपल्यामुळे वाहने रस्त्यात मध्येच बंद पडल्याचे प्रकार नेहमीच घडत असतात. मात्र, डिझेल संपल्याने हजारो प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन मध्येच बंद पडल्याचे कधी आपल्या ऐकण्यातही आले नसेल. मात्र, प्रत्यक्षात असा प्रकार घडला आहे.  डिझेल संपल्यामुळे ट्रेन मध्येच बंद पडली. प्रवाशांनी चार तास राडा घातल्यानंतर स्टेशन मास्तरने  डिझेलची व्यवस्था केली. 


हे देखील वाचा... GK : भारतातील एकमेव राज्य जिथे एकही कुत्रा दिसणार नाही; 99 टक्के लोकांना उत्तर माहित नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमध्ये हा विचित्र प्रकार घडला आहे.  दरभंगा ते फोर्ब्सगंज दरम्यान डीएमयू ट्रेन धावते.  सोमवारी रात्री ही ट्रेन दरभंगाहून फोर्ब्सगंजकडे निघाली होती. यावेळस ट्रेनमधील डिजेल संपले. यामुळे ट्रेन मध्येच थांबली. अचानक ट्रेन थांबल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. प्रवाशांनी चौकशी केली असता डिझेल संपल्याने ट्रेन थांबल्याचे त्यांना सांगण्यात आले. 


बराच वेळ वाट पाहूनही डिझेलची व्यवस्था झाली नाही. ट्रेन जागच्या जागी थांबून राहिल्याने प्रवासी संतापले. प्रवाशांचा संताचा उद्रेक झाला. प्रवाशांनी मोठा गोंधळ घातला. तब्बल चार तास प्रवाशांचा राडा सुरु होता. प्रवाशांचा संताप पाहून लोकल स्टेशन मास्तरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक पातळीवर डिझेलची व्यवस्था केली. ट्रेनमध्ये डिझेल भरल्यानंतर तब्बल 5 तासानंतर ही ट्रेन सुरु झाली. मात्र, यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 


डीएमयू गाड्यांना डिझेल पुरवण्यात अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे हा सर्व गोंधळ झाला. डिझेल पुरवण्यात अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा फटका प्रवाशांना बसला. ट्रेनमध्ये पुरेशे डिझेल नसल्याने ट्रेन मध्येच थांबली. आधीच ट्रेनमध्ये पुरेसे इंधन आहे की नाही याची योग्य तपासणी केली असती तर असा प्रकार घडलाच नसता असा संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे.