मुंबई : जेवण बनवताना सहसा एखादा पदार्थ दुर्लक्षानं जास्त शिजणं आणि पुढे तो थेट करपणं हे अतिसामान्य आहे. बऱ्याचदा नजरचुकीनं एखादा पदार्थ करपतो आणि मग भांडंही त्यामुळं पूर्णपणे काळवंडून जातं. करपल्यामुळं काळवंडलेली भांडी स्वच्छ करताना मात्र नाकी नऊ येतात. भांडं घासताना त्यावर कितीही जोर देऊन घासली तरीही त्याचा काळपटपणा काही केल्या जात नाही. (darken utensils cleaning tips Onion Home Remedies read )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा वेळी बऱ्याच शकला लढवूनही, भांडं जैसे थे. पण, आता ही समस्या फार काळ टिकणार नाही. कारण, घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणाऱ्या कांद्यापासूनच या समस्येवर तोडगा निघणार आहे. 


नेमकं काय करावं? 
(Burn Pot) करपून काळवंडलेलं भांडं स्वच्छ करण्यासाठी एक मोठा कांदा आणि व्हिनेगर घ्या. यानंतर एका वाटीमध्ये कांद्याचा रस आणि अर्धा कप व्हिनेगर मिसळा. यानंतर हे मिश्रण भांड्याच्या काळपट भागावर लावा आणि ते स्वच्छ करा. अगदी काही क्षणांत भांडं चमकू लागेल. 


कांद्याचा सालींचाही होईल वापर 
करपून काळी झालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी कांद्याच्या सालींचाही वापर केला जाऊ शकतो. यासाठी कांद्याच्या साली करपलेल्या भांड्याच्या तळाशी टाका, त्यात पाणी मिसळा आणि 20 मिनिटं उकळा. पाणी उकळल्यामुळं त्या मिश्रणाची एक पेस्ट तयार होईल, त्यानं हे भांडं घासून स्वच्छ करा. 


करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी खायचा सोडाही वापरता येऊ शकतो. यासाठी कांद्याचे दोन भाग करून त्यावर सोडा घेऊन करपलेल्या भागावर तो चोळावा, असं काही वेळा केल्यास भांड्याचा काळेपणा निघून जाईल. 


(वरील माहिती सर्वसामान्य माहितीच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)