नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नमो अॅपवरील डेटा अमेरिकन कंपन्यांना पुरवला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. फ्रेंच अभ्यासक इलियट अँडरसन यांनी केलेल्या संशोधनातून ही माहिती पुढं आल्याचं राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय.


अॅपच्या धोरणात माहिती ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँडरसन यांनी केलेल्या दाव्यानुसार नमो अॅपवरील डेटा सुरक्षित राहिल, असा उल्लेख नमो अॅपवरच्या पूर्वीच्या सुरक्षा धोरणात होता. त्यानंतर वापरकर्त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय हे धोरण बदलण्यात आल्याचा दावा अँडरसन यांनी केलाय.


मात्र आता वापरकर्त्यांचं नाव, ईमेल, फोन नंबर, लोकेशन, डिव्हाईसची माहिती आणि नेटवर्क कॅरिअरची माहिती थर्ड पार्टीला दिली जाऊ शकते, असं नमो अॅपच्या सुधारित सुरक्षा धोरणात म्हणण्यात आल्याचा दावा अँडरसन यांनी केलाय.


पंतप्रधानांवर निशाणा


सध्या हे अॅप वापरणाऱ्यांची माहिती सुरक्षित नसल्याचा त्यांचा दावा आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधलाय. नमो अॅपच्या व्यवस्थापनानं राहुल गांधींचे हे आरोप फेटाळले आहेत.