Pranshuk Kanthed Jain Muni : प्रत्येकालाच गल्लेलठ्ठ पगार आणि मोठ्या पदाची अपेक्षा असते. यासाठी प्रत्येक तरूण दररोज धडपड असतो. त्यात यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या एका 28 वर्षीय तरूणाने सन्यासी बनण्याचा निर्णय घेतला आहे. हा तरूण डेटा सायंटिस्ट (Data Scientist) होता. त्याने युएसएमधील 1.25 करोडच्या नोकरीवर पाणी सोडून तो जैन मुनी (Jain Muni) बनला आहे. त्याच्या या निर्णयाचा कुटूंबियांना आनंद आहे.  


जैन संत होण्याची दीक्षा घेणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील प्रांशुक काठेड (Pranshuk Kanthed) हा 26 डिसेंबर रोजी आचार्य उमेश मुनीजी महाराज यांचे शिष्य जिनेंद्र मुनीजी यांच्याकडून जैन संत होण्याची दीक्षा घेणार आहेत. यासाठी त्याने अमेरिकेतली 1.25 कोटी रुपयांची नोकरी सोडली आणि तो गेल्या वर्षी जानेवारीत भारतात परतला होता. प्रांशुक  2016 ते जानेवारी 2021 पर्यंत अमेरिकेत राहत होता. त्यांनी जवळपास 3 वर्षे डेटा सायंटिस्ट (Data Scientist) म्हणून काम केले होते. 


कोण आहे हा तरूण?


प्रांशुक काठेड (Pranshuk Kanthed) हा देवास जिल्ह्यातील हातपिपळ्याचा रहिवासी आहे. लहानपणापासूनच त्याला संत व्हायचे होते. या प्रबळ इच्छेने तो आता जैन साधू होण्याची दीक्षा घेणार आहे. हातपिपळ्यात 3 दिवसीय दीक्षा महोत्सव होणार आहे.देशाच्या विविध भागातून सुमारे 53 जैन साधू या महोत्सवात येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत 26 डिसेंबर रोजी दीक्षाभूमीचा महोत्सव पार पडणार आहे.  


जैन संत होण्याचे कारण काय? 


जेव्हा तो या जगाचा आनंद पाहतो तेव्हा त्याला ते क्षणिक वाटते. आनंदाने आपली तळमळ वाढते असे तो म्हणतो. शाश्वत सुखासाठी मी जैन संत होणार आहे. त्यासाठी त्यांनी सुमारे दीड वर्षे परिश्रमही घेतले होते. 


दरम्यान आता 26 ड़िसेंबर रोजी दीक्षा घेतल्यानंतर तो साधूसारख आयुष्य जगणार आहे. या त्याच्या निर्णयाने त्याचे कुटूंबिय खुश आहे.