मुंबई : देवराष्ट्रे  गावातील दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली अनोखी जुगाड जीप तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल, त्यांच्या या जुगाड जिपची सोशल मीडियावर भलतीच चर्चा सुरू आहे. बाईक सारखी किक मारुन लोहार यांची जुगाड जीप सुरू होते. टाकावू वस्तुपासून आणि दुचाकीचे इंजीन वापरुन बनवलेल्या या जीपला आनंद महेंद्रा यांनी मोठी ऑफर दिली होती. मात्र दत्तात्रय लोहार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ही ऑफर नाकारली. खरेतर आनंद महेंद्रा यांच्या सारख्या मोठ्या व्यक्तीच्या ऑफरला नकार दिल्यामुळे लोहार कुटुंब आणखी चर्चेत आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरती तुम्ही दत्तात्रय लोहार यांना किक मारुन जीप चालू करताना पाहिले असेलच. या व्हिडीओवर आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी ही गाडी बनवऱ्याला दत्तात्रय लोहार यांचे त्यांनी कौतुक केले आहे. तसेच, त्यांना नवीन बोलेरो देणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले.


व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहीले की, 'ही गाडी कुठल्याही नियमाशी जुळत नाही, पण, मी आमच्या लोकांच्या कल्पकतेचे आणि क्षमतेचे कौतुक करणं कधीही थांबवणार नाही' असं महिंद्रा यांनी व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलंय. 


पुढे त्यांनी लिहिलं की, 'या वाहनाच्या बदल्यात मी त्याला वैयक्तिकरित्या बोलेरो गाडी देईन. त्याची ही गाडी इतरांना प्रेरणा देण्यासाठी MahindraResearchValley मध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाऊ शकते.'



आनंद महेंद्रा यांच्या या ट्वीट बद्दल बोलताना दत्तात्रय लोहार यांनी प्रतिकिया दिली, ज्यामध्ये त्यांनी त्यांची गाडी देण्यास नकार दिला.


दत्तात्रय लोहार यांनी मीडियाशी बोलताना गाडीसंबंधी वक्तव्य केलं. ते म्हाणाल, "माझी गाडी आनंद महिंद्रा यांना आवडली याचा मला खूप आनंद वाटतो. पण त्यांनी देऊ केलेली गाडी वापरण्याची माझी परिस्थिती नाही."


यावर दत्तात्रय लोहार यांच्या पत्नी राणी लोहार यांनी देखील आपलं वक्तव्य केलं,  त्या म्हणाल्या, "ते आम्हाला नवी गाडी देत आहेत, पण त्यांना आमची ही गाडी हवी आहे. पण आम्ही ही गाडी खूप हालाकीच्या परिस्थितीत तयार केलीय. 2 वर्षांपासून आम्ही याासाठी साहित्य गोळा केलंय. मागील 5-6 महिन्यांपासून या गाडीचा वापर सुरू आहे. या गाडीमुळे आमची खूप बचत झाली. ही आमची पहिली लक्ष्मी आहे त्यामुळे आम्हाला ती कोणाला देणं पटत नाही. ही गाडी तयार केल्यानंतर पहिल्यापेक्षा आमचं चांगलं सुरू आहे."


पुढे राणी लोहार म्हणाल्या, "आम्ही त्यांना ही पहिली गाडी देऊ शकत नसलो तरी, आम्ही त्यांना दुसरी गाडी बनवून देऊ. त्यांनी आम्हाला नवी गाडी द्यावी अशी आमची मागणी नाही, पण त्यांनी स्वखुशीने गोष्ट दिली तर आम्ही त्याचा स्वीकार करु."