Gold Price Today : जाणून घ्या सोन्याचे आजचे दर
सोन्याचे दर अद्यापही अस्थिर आहेत.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. सोने आणि चांदीच्या दरात होत असलेल्या चढ-उतारामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. 2021 या वर्षाचं आर्थिक बजेट सादर झाल्यानंतर सोन्याचे दर कमी झाले. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा सोन्याच्या दरात वाढ दिसून आली. मंगळवारी 10 ग्राम सोनं 46 हजार 801 रूपयांवर बंद झालं. सध्या याच दरात सोनं ट्रेड करत आहे.
चढ-उतारानंतर सोन्याचे दर दोन वेळा 46 हजार 900 रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सोन्याचे दर घसरले देखील. कोरोना संकटात सोन्याचे भाव वाढले होते. ऑगस्ट 2020 मध्ये MCXवर 10 ग्राम सोन्याचे दर 56 हजार 191 रूपयांवर पोहोचले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्याचे दर 17 टक्क्यांनी खाली आले आहे.
MCXवर 10 ग्राम सोन्याचे दर 46 हजार 800 रूपये इतके आहेत. म्हणजेच सोन्याचे दर 9 हजार 300 रूपयांनी घसरले आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील चढ उतार सुरू आहे. सध्या प्रत्येक दिवशी सोन्याच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू आहे.
या आठवड्यातील सोन्याचे दर
वार सोन्याचे दर
सोमवार 46901
मंगळवार 46802
बुधवार 46800
या आठवड्यातील चांदीचे दर
वार चांदीचे दर
सोमवार 70432 रू. किलो
मंगळवार 69341 रू. किलो
बुधवार 69470 रू. किलो