सुरत :  मृत व्यक्ती अवयदानामुळे समाजामध्ये अवयवरुपी जिवंत राहू शकतो. अवयदावानाविषयी देशात दिवसेंदिवस जागृकता वाढताना दिसत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व समाज घटकातील व्यक्ती अवयव दानासाठी पुढाकार घेत आहेत. 


सुरतमध्ये अवयव दानाची सकारात्मक बाजू समोर आली आहे. ३०  वर्षीय विलास घाटला दहीहंडीदरम्यान झाडावरुन पडून मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी सूरतमधील न्यू सिव्हिल रुग्णालयात त्याला नेण्यात आले पण डॉक्टरांनी तपासाअंती त्याला ब्रेन डेड घोषित केले. विलासला ब्रेन हॅमरेज झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. 


दरम्यान या सरकारी रुग्णालयाने डोनेटलाइफच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधून माहिती दिली असता, त्यांनी विलासच्या कुटुंबियांशी संपर्क साधून अवयनदान करण्यासाठी तयार केलं. विलासच्या कुटुंबियांनीही या श्रेष्ठदानाचे महत्त्व ओळखून अवयव दानास पाठिंबा दिला. 


या चौघांना मिळाले नवे आयुष्य 


-विलासचं ह्रदय मुंबईमधील २० वर्षीय विद्यार्थिनीला देण्यात आलं आहे. 
-विलासची किडनी गांधीधामधील ४६ वर्षीय जिमी अशोक दलाल 
-राजस्थानच्या मितीका सोनी यांना देण्यात आली. 
-यकृत ३८ वर्षीय ईश्वार मेंदपाडा यांना देण्यात आलं.